बारबालेची फसवणूक करणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:08 AM2018-05-30T01:08:36+5:302018-05-30T01:08:36+5:30

बारबालेशी असलेल्या सलगीचा आणि तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्याकडून साडेसात लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा १२ लाखांचा ऐवज घेऊन पसार

Barbarale cheating deceased | बारबालेची फसवणूक करणाऱ्याला अटक

बारबालेची फसवणूक करणाऱ्याला अटक

Next

ठाणे : बारबालेशी असलेल्या सलगीचा आणि तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्याकडून साडेसात लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा १२ लाखांचा ऐवज घेऊन पसार झालेल्या दीपक हरिओम बेहल (४६) या भामट्याला कासारवडवली २३ मे रोजी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख ७० हजारांचे नऊ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
कासारवडवलीतील हायपरसिटी मॉलच्या मागे राहणाºया सीमा वर्मा (३२, नावात बदल) या पूर्वाश्रमीच्या बारबालेशी दीपकची ओळख झाली होती. त्यांच्यात मैत्री झाल्यामुळे त्याने तिला बहीण मानले. तिच्या पाच वर्षांच्या मुलासह ते घोडबंदर रोडवरील या घरात एकत्रच वास्तव्याला होते. परिस्थितीमुळे तसेच अशिक्षितपणामुळे बारबालेसारखी नोकरी तिला पत्करावी लागली होती. पण, आपल्या मुलाला चांगले शिक्षण देण्याचे तिचे ध्येय होते. दरम्यानच्याच काळात तिची दीपकशी ओळख झाली होती. बँक किंवा इतर व्यवहारात तिला कसलीच माहिती नसल्यामुळे एक हुशार आणि विश्वासू असलेल्या दीपकला तिने तिच्याच घरात तडजोड म्हणून आसराही दिला. याने तिचा विश्वास संपादन करून तिच्याकडून तिचे एटीएमकार्ड, चेकबुक स्वत:कडे घेतले. त्याद्वारे त्याने गेल्या काही दिवसांपासून तिच्या बँक खात्यातील साडेसात लाखांची रोकड, एक लाख ४४ हजारांचे आठ तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, ९० हजारांच्या अंगठ्या, ७२ हजारांच्या सोन्याच्या बांगड्या, एक लाख आठ हजारांचा सोन्याचा हार असा सुमारे १२ लाखांचा ऐवज घेऊन तो मे २०१८ च्या पहिल्या आठवड्यात पसार झाला. मुलाला शाळेत घालण्यासाठी पैशांची जमवाजमव करताना तिने बँक खाते आणि दागिन्यांची चाचपणी केली. तेव्हा पैसे आणि दागिने गायब झाल्याचे आढळले. या प्रकारानंतर हवालदिल झाल्याने तिने कासारवडवली पोलीस ठाण्यात १७ मे रोजी तक्रार केली.

वपोनि दत्तात्रय ढोले, पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांच्या पथकातील सहा. पोलीस निरीक्षक कैलास टोकले, उपनिरीक्षक मनीष पोटे यांनी त्याला २३ मे रोजी अटक केली. ठाणे न्यायालयाने २९ मे रोजी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Barbarale cheating deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.