यंदाच्या पावसाळ्यात बारवीत वाढीव पाणी

By admin | Published: May 7, 2016 12:43 AM2016-05-07T00:43:55+5:302016-05-07T00:43:55+5:30

बारवी धरणाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाले असून फक्त दरवाजे बसविणे शिल्लक आहे. ते काम महिनाअखेरीस सुरू होईल. त्यामुळे यंदाच्या पावसाळ््या बारवी धरणात जादा पाणी

Barley increased water during this monsoon | यंदाच्या पावसाळ्यात बारवीत वाढीव पाणी

यंदाच्या पावसाळ्यात बारवीत वाढीव पाणी

Next


डोंबिवली : बारवी धरणाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाले असून फक्त दरवाजे बसविणे शिल्लक आहे. ते काम महिनाअखेरीस सुरू होईल. त्यामुळे यंदाच्या पावसाळ््या बारवी धरणात जादा पाणी साठविण्यास सुरूवात होईल. त्यामुळे ४० टक्के जादा साठा उपलब्ध होणार असून पुढच्या वर्षी पाणीटंचाईची स्थिती राहणार नाही, अशी माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रकाश लोणकर यांनी दिली.
या वेळी डोंबिवली एमआयडीसीचे प्रमुख अभियंता शंकर जगताप आणि संजीव साळवे उपस्थित होते. डोंबिवली पत्रकार संघाच्यावतीने शुक्रवारी बारवी धरणाची सद्यस्थिती आणि विस्थापितांचे पुनर्वसन यांची पाहणी करण्यासाठी दौरा झाला. तेव्हा पत्रकारांना माहिती देताना लोणकर आणि जगताप यांनी सांगितले, धरणाची उंची तीन मीटरने वाढवली आहे. पाणी साठवल्याने विस्थापित होणाऱ्या काचकोली आणि तोंडली गावातील ४० कुटुंबांसाठी गावठाणात संक्र मण शिबिराची सोय करणार आहे.
धरणाची उंची वाढविल्याने सहा गावे आणि पाच पाड्यांमधील १७८ कुटुंबियांचे पुनर्वसन केले जाणार आहे. काहींनी नोकरी आणि जमिनीच्या मूल्यांकनावरून स्थलांतरित होण्यास विरोध केला आहे. या गावांचे सर्वेक्षण २००९ मध्ये केले होते. मात्र आता २०१४ च्या बाजारभावाने घराचे पैसे हवे आहेत. पूर्वी ७६५ कुटुंबीय होते. ती आता ११०५ झाली आहेत. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबियांना केडीएमसी आणि ठाणे महापालिकेत नोकरीची हमी हवी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सध्या बारवी धरणालगत वीजनिर्मिती प्रकल्प सुरु असून त्यातून १.१ मेगावॅट वीज तयार होऊन वॉटर फिल्टर प्लांटसाठी वापरली जाते. (प्रतिनिधी)

यंदा जादा पाणी
सध्या बारवी धरणात ४३.११ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच दिवसापर्यंत ४२.९६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. पूर्वी बारवी धरणाची उंची ६५.६० इतकी होती. ती आता ६८.६० इतकी झाली आहे. यामुळे धरणात २३२.५० दशलक्ष घनमीटरपर्यंत पाणीसाठा वाढणार आहे. धरणात ११ नवीन वक्र ाकार दरवाजे लावण्याचे काम सुरू असून ते या महिन्याभरात सुरु करण्यात येतील असे जगताप यांनी सांगितले.

Web Title: Barley increased water during this monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.