गेल्यावर्षीच्या तुलनेत बारवी धरण निम्मेच भरले; भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 08:25 PM2020-08-03T20:25:55+5:302020-08-03T20:26:04+5:30
जे धरण गेल्यावर्षी 4 ऑगस्टला पूर्ण भरुन वाहत होते तेच धरण यंदा 4 ऑगस्टला निम्मे देखील भरले नाही. आजच्या घडीला भरणात 49 टक्केच पाणी साठा असुन हे धरण भरण्यासाठी धरण क्षेत्रात पावसाची गरज भासणार नाही
बदलापूर : बारवी धरणाची उंची 4 मिटरणो वाढविल्यानंतर प्रथमच 4 ऑगस्ट 2019 मध्ये हे धरण भरुन वाहू लागले होते. धरणाचीउंची वाढविल्यावर पहिल्याच वर्षी हे धरण भरल्याने पाणी टंचाईचे संकट कमीझाले होते. मात्र यंदा 4 ऑगस्ट रोजी बारवी धरण हे निम्मेच भरल्याने यंदा पाणी कपातीची भिती निर्माण होत आहे. बारवी धरण क्षेत्रत यंदा पाऊस कमी झाल्याने संपूर्ण ठाणो जिल्ह्यावर पाणी टंचाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. मुरबाड आणि अंबरनाथ तुक्याला जोडणारा बारवी धरणाची उंची चार मिटरणो यंदा वाढविण्यात आली होती.
पूर्वी धरणाच्या पाण्याची पातळी ही ही 68.60 मिटर येवढी होती. या जुन्या पातळीनुसार धरणात 230 एमसीएम येवढा पाणी साठा बारवीत होत होता. या धरणाची उंची 4 मिटरने वाढविण्यात आली होती. सोबत या धरणावर स्वयंचलित दरवाजेही बसविण्यात आले आहे. त्यामुळे या धरणाची पाण्याची पातळी ही 72. 6क्येवढी झाली आहे. प्रथमच हे धरण 2019 मध्ये नव्या उंची नुसार भरण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्याच वर्षी या धरणात वाढीव पाण साठा निर्माण करण्यात यश आले आहे. धरणात 340 एमसीएम पाणी साठा निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी हे धरण 4 ऑगस्ट रोजी पूर्ण भरुन वाहू लागले होते. गेल्यावर्षी धरण क्षेत्रत पाऊस चांगला झाल्याने धरणात वाढीव क्षमतेनुसार पाणी साठा करता आला. यंदा देखील धरण भरेल अशी अपेक्षा असतांना जुन आणि जुलै महिन्यात कमी पाऊस झाल्याने अद्याप धरणात योग्य पाणी साठा निर्माण झालेला नाही.
जे धरण गेल्यावर्षी 4 ऑगस्टला पूर्ण भरुन वाहत होते तेच धरण यंदा 4 ऑगस्टला निम्मे देखील भरले नाही. आजच्या घडीला भरणात 49 टक्केच पाणी साठा असुन हे धरण भरण्यासाठी धरण क्षेत्रात पावसाची गरज भासणार नाही. मात्र मुबलक पाऊस होत नसल्याने धरणाची पातळी आजही खालावलेली आहे. गेल्या काही दिवसात धरण क्षेत्रत योग्य पाऊस न झाल्यास संपूर्ण ठाणो जिल्ह्याला पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येणार आहे. बारवी धरणातुन ठाणो जिल्ह्यातील ठाणो शहर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणो जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्रला पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच ग्रामिण भागाला देखील याच ठिकाणाहुन पाणी पुरवठा केला जात आहे. ठाणो जिल्ह्याची तहाण भागविणारे बारवरी धरण हे निम्मेच भरल्याने पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे