ठाणे जिल्ह्यातील महापालिकांसह उद्योगाना पाणी पुरवठा करणारे बारवी धरण बरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 05:39 PM2018-07-22T17:39:39+5:302018-07-22T17:47:00+5:30
शनिवारी सायंकाळी बारवी धरण ९९ टक्के बरले होते. रात्री ११ वाजता हे धरण १०० टक्के भरुन वाहू लागले आहे. या धरणाची उंची ६८.७४ मिटर येवढी असुन या धरणात २३६ एमसीएम पाणीसाठी निर्माण झाला आहे. बारवी धरल्यान भरल्याने या ठिकाणी असलेल्या दरवाज्यांचे काम अजुन पूर्ण न झाल्याने धरणातील अतिरीक्त पाणी वाहुन जाण्यासाठी धरणात नसर्गिक मार्ग सुरु ठेवण्यात आला
ठाणे : अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यभागी असलेले बारवी धरण शनिवारी मध्यरात्री भरुन वाहू लागले आहे. या धरणाच्या पात्रात गेल्या १५ दिवसांपासुन होणा-या मुसळधार पावसामुळे हे धरण यंदा जुलै महिन्यातच भरले आहे. एमआयडीसी क्षेत्र, उल्हासनगर, केडीएमसी ,ठाणे या महापालिका व अंबरनाथ , बदलापूर नगरपालिकांना मुबलक पाणी पुरवठा या बारवी धरणातून होतो .
शनिवारी सायंकाळी बारवी धरण ९९ टक्के बरले होते. रात्री ११ वाजता हे धरण १०० टक्के भरुन वाहू लागले आहे. या धरणाची उंची ६८.७४ मिटर येवढी असुन या धरणात २३६ एमसीएम पाणीसाठी निर्माण झाला आहे. बारवी धरल्यान भरल्याने या ठिकाणी असलेल्या दरवाज्यांचे काम अजुन पूर्ण न झाल्याने धरणातील अतिरीक्त पाणी वाहुन जाण्यासाठी धरणात नसर्गिक मार्ग सुरु ठेवण्यात आला आहे. या धरणात पाणी वाहू लागल्याने धरणाखालील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. बारवी धरणाची उंची ९ मिटर वाढलेली असली तरी अजुनही त्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यात आलेले नाही. बारवीच्या पानलोट क्षेत्रातील ग्रामस्थांनी अजुनही गाव न सोडल्याने धरणात कमी पाणी साठ साठविण्यात येत आहे. गेल्या चार वर्षांपासुन हा प्रश्न निकाली निघत नसल्याने धरणात अपुराच पाणी साठा साठविला जात आहे. या धरणग्रस्तांचा प्रश्न कायमचा निकाली निघाला असता तर धरणात दुप्पट पाणी साठा साठविणे शक्य झाले असते.