धोकादायक नागुबाई निवासच्या ७२ पैकी ४६ कुटूंबियांना बीएसयूपीच्या घरांचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 06:17 PM2017-11-01T18:17:56+5:302017-11-01T18:18:44+5:30

देवीचा चौक येथिल नागुबाई निवास ही इमारत शुक्रवारी रात्री खचली, तेव्हापासून या धोकादायक इमारतीमधील रस्त्यावर आलेल्या ७२ कुटूंबियांपैकी अर्ज केलेल्या ४६ कुटुंबांना पाच दिवसांनी कचोरे येथिल निवासनगरच्या बीएसयूपीच्या घरांमध्ये

The base of the BSUP for 46 families of the dangerous Nagugai residence | धोकादायक नागुबाई निवासच्या ७२ पैकी ४६ कुटूंबियांना बीएसयूपीच्या घरांचा आधार

धोकादायक नागुबाई निवासच्या ७२ पैकी ४६ कुटूंबियांना बीएसयूपीच्या घरांचा आधार

Next

डोंबिवली: देवीचा चौक येथिल नागुबाई निवास ही इमारत शुक्रवारी रात्री खचली, तेव्हापासून या धोकादायक इमारतीमधील रस्त्यावर आलेल्या ७२ कुटूंबियांपैकी अर्ज केलेल्या ४६ कुटुंबांना पाच दिवसांनी कचोरे येथिल निवासनगरच्या बीएसयूपीच्या घरांमध्ये बुधवारी तात्ुपरता निवारा मिळाला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या घरांच्या चाव्या रहिवाश्यांना सुपुर्त केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे त्या बेघर झालेल्या नागरिकांना निवारा देणं शक्य झाल्याबद्दल पालकमंत्री शिंदेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तर रहिवाश्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जयजयकार करत घोषणा दिल्या. पालकमंत्री एकनाथ शिंदे आगे बढो.... असा नारा दिला. रहिवाश्यांच्या एकजूटीचा विजय असो असे म्हणत समाधान व्यक्त केले.
दोन दिवसांपासून शिंदेंनी मुख्यमंत्र्यांकडे त्या रहिवाश्यांना आधार मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यानूसार ‘विशेष बाब’ म्हणुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी संमती देत तातडीने नगरविकास खात्याच्या अधिका-यांना नीर्देश दिले. बुधवारी सकाळी या विभागाचे अधिकारी संजीव कुमार यांनी होकार दिल्याचे शिंदेंनी ‘लोकमत’ला सांगितले. २०१४ पासून धोकादाय घोषित झालेल्या नागुबाई निवासच्या दूघर्टनास्थळी रविवारी पालकमंत्र्यांनी भेट दिली होती. त्यावेळी बेघर झालेल्या रहिवाश्यांशी चर्चा करतांना घराला घर द्या आणखी काही नको अशी मागणी रहिवाश्यांनी केली. त्यावर महापौर राजेंद्र देवळेकर, केडीएमसीचे आयुक्त पी.वेलारसू यांच्याशीही पालकमंत्र्यांनी चर्चा करत कचोरे येथिल घरांमध्ये निावारा द्यावा असे सांगितले. पण तशी तरतूद नसल्याचा पवित्रा आयुक्त पी. वेलारसू यांनी घेतल्याने महापौर देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे यांनी पालकमंत्र्यांना स्पष्ट केले. त्यानूसार शिंदेंनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी भेट घेत तोडगा काढावा अशी विनंती केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्व परिस्थिती समजून घेत विशेष बाब’ म्हणुन परवानगी दिल्याने रहिवाश्यांना दिलासा मिळाला. ४६ अर्जांवयतिरीक्त आणखी १५ अर्ज बुधवारी आले असून ते आयुक्त, महापौर यांच्याकडे देण्यात येणार असून त्यानंतर त्या कुटूंबियांनाही घरे मिळतील असेही यावेळी सांगण्यात आले.
शिंदेंनी घराचा ताबा देतांना उपस्थित असलेल्या प्रत्येकाला घर, परिसर स्वच्छ ठेवा, घाण करु नका, असे आवाहन करत हा निवारा तात्पुरता असल्याचे स्पष्ट केले. तसेच नागुबाई निवासचे मालक भरत जोशी यांनी तातडीने इमारत उभी करावी. त्यांच्या भाडेकरुंना तेथे घरे द्यावी, न्याय द्यावा. त्यासाठी महापौर देवळेकर , मोरे पाठपुरावा करतील असेही ते म्हणाले. कल्याण-डोंबिवली परिसरात मोडकळीस आलेल्या शेकडो इमारती असून त्यात राहणा-या सर्व रहिवाश्यांना दिलासा मिळावा यासाठी क्लस्टर योजना राबवण्याचा राज्य शासनाचा मानस असून लवकरच ठाण्याप्रमाणे येथेही त्या योजनेला मंजूरी मिळेल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. बीएसयुपीची घरे ही प्रकल्पग्रस्तांना देण्यात येतात, परंतू नागुबाई निवासच्या रहिवाश्यांवर जे संकट कोसळले आहे, त्यामुळे ते बेघर झाले होते. त्यांना ही सुविधा मिळत असेल तर त्यास प्रत्येकाने सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधींना केले. त्यावेळी महापौर देवळेकर, गटनेते रमेश जाधव, स्थायीचे माजी सभापती, नगरसेवक दिपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, नगरसेविका मनिषा धात्रक, माजी सभागृह नेते, माजी नगरसेवक कैलास शिंदे, प्रकाश तेलगोटे, युवा काँग्रेसचे अमित म्हात्रे, आरपीआयचे माणिक उघडे आदींसह असंख्य रहिवासी उपस्थित होते.
* इमारत खचल्याच्या दूर्घटनेपासून ‘लोकमत’ने येथिल रहिवाश्यांना घरे मिळेस्तोवर सातत्याने पाठपुरावा केला. रहिवाश्यांची बाजू लावुन धरली. रहिवाश्यांना न्याय मिळवून दिला, त्याबद्दल शेकडो रहिवाश्यांनी ‘लोकमत’चे जाहिर वाचन करत कौतुक केले. पालकमंत्र्यांसोबतच ‘लोकमत’ची भूमिका विशेष महत्वाची होती. अन्यथा निवारा मिळण्यासाठी अडथळे आले असते, असे मत संजय पवार, प्रसाद भानुशाली, चिंतामणी शिदोरे, राशन सावला, संतोष गिट्टे आदींनी व्यक्त केले. महापौर देवळेकर यांनीही या यशामध्ये नक्कीच लोकमत’चा पाठपुरावा महत्वाचा असल्याचे सांगितले.
* दरम्यान, कचो-यात रहिवाश्यांना चावी वाटपाचा कार्यक्रम सुरु असतांनाच धोकादायक नागुबाई निवासचा बहुतांशी भाग पाडण्यात आला. गुरुवारी सकाळपर्यंत इमारत पूर्ण पाडण्यात येणार असल्याचे ह प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांनी सांगितले.
=================
फोटो आनंद मोरे

Read in English

Web Title: The base of the BSUP for 46 families of the dangerous Nagugai residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.