‘व्हॉटसअ‍ॅप’वरील माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांनी घडविली पिता पुत्राची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 05:51 PM2020-12-09T17:51:04+5:302020-12-09T17:54:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एका व्हॉटसअ‍ॅप गृपवर मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे शहर पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने अवघ्या १३ ...

Based on the information on WhatsApp, Thane police arranged a father-son meeting | ‘व्हॉटसअ‍ॅप’वरील माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांनी घडविली पिता पुत्राची भेट

चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची कामगिरी

Next
ठळक मुद्दे गतिमंद मुलगा पुन्हा मिळाल्याने पालकांच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’ चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एका व्हॉटसअ‍ॅप गृपवर मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे शहर पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने अवघ्या १३ वर्षीय मुलाला त्याच्या वडिलांची महिनाभराने भेट घडवून आणली. नालासोपाºयातून अचानक बेपत्ता झालेला आपला मुलगा पुन्हा सुखरुपपणे मिळाल्यामुळे या मुलाच्या पालकांच्या चेहºयावर समाधानाची ‘मुस्कान’ दिसून आली.
सध्या ठाणे शहर पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या मार्फतीने ‘मुस्कान -९’ ही लहान मुलांना शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर एका व्हॉटसअ‍ॅप ग्रृपवर या गतिमंद विशेष मुलाची त्रोटक माहिती २८ नोव्हेंबर २०२० रोजी मिळाल्यानंतर अवघ्या चारच तासांमध्ये त्याची आणि त्याच्या वडिलांची भेट घडविण्यात या पथकाला यश आले.
सलीम (नावात बदल) लहान असतांनाच त्याच्या आईचे निधन झाले. लॉकडाऊन संपल्यानंतर बेकरीत काम करणाºया त्याच्या वडिलांनी २८ आॅक्टोबर २०२० रोजी त्याला गावावरुन नालासोपाºयामध्ये आणले. ते त्याला घरारत ठेवून कामाला जात होते. त्याचदरम्यान, तो घरातून अचानक बेपत्ता झाला. याबाबत ७ नोव्हेंबर रोजी त्याच्या वडिलांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी तो कल्याण येथील खडकपाडा पोलिसांना आढळून आला. त्याच्याकडून पुरेशी माहिती न मिळाल्याने पोलिसांनी त्याला उल्हासनगर बालसुधारगृहात दाखल केले. २८ नोव्हेंबर रोजी ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटला एका व्हॉटसअ‍ॅप ग्रृपवर त्याची माहिती मिळाली. यामध्ये त्याचा लहानपणीचा जुना फोटो आणि केवळ नालासोपारा इतक्याच त्रोटक माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने यांच्या पथकातील पोलीस हवालदार भाऊसाहेब शिंगारे आणि पोलीस नाईक प्रमोद पालांडे यांनी त्याचा उल्हासनगरच्या बालसुधारगृहात शोध घेतला. अवघ्या चार तासात शोध पूर्ण करुन सलीमला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. तो गतिमंद असून त्याचा शोध घेण्यासाठी त्याचे वडील रिक्षाने मुंबईत फिरत ४ डिसेंबर रोजी माटुंगा येथे आले होते. त्याचवेळी ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने त्यांना मुलाची माहिती दिली. मुलाचा लहानपणीचा जुना फोटो त्यांनी पोलिसांकडे दिला होता. त्याचवेळी मुलाने बालसुधारगृहामध्ये चुकीचे नाव दिले. अशी संभ्रमाची माहिती असतांनाही या मुलाला सुखरूप त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात या पथकाला यश आले. आपला मुलगा सुखरुपरित्या परत मिळाल्याने मुलाच्या वडिलांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले आहेत.

 

Web Title: Based on the information on WhatsApp, Thane police arranged a father-son meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.