खड्डे बुजविण्यासाठी गुगल मॅपिंगचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:54+5:302021-07-08T04:26:54+5:30

ठाणे : पावसाळा सुरू झाला की शहरात रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात होते. ठाण्यात यंदाही पावसाळा सुरू होताच शहरातील ...

The basis of Google mapping for filling pits | खड्डे बुजविण्यासाठी गुगल मॅपिंगचा आधार

खड्डे बुजविण्यासाठी गुगल मॅपिंगचा आधार

Next

ठाणे : पावसाळा सुरू झाला की शहरात रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात होते. ठाण्यात यंदाही पावसाळा सुरू होताच शहरातील विविध भागात खड्डे पडण्यास सुरुवात झाली. परंतु, ते शोधून त्याची नोंद पालिकेने यंदा गुगल मॅपिंगद्वारे करून पडलेले खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. यावर अडीच कोटींचा खर्च यंदा केला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभाग समितीनिहाय २५ लाखांचा खर्च निश्चित केला आहे.

दरवर्षी खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रयोग केले जातात. कधी जेट पॅचिंग मशीनचा आसरा घेतला जातो, तर कधी विविध तंत्रज्ञान वापरून खड्डे बुजविले जातात. यंदा मात्र अशा कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाचा आधार न घेता, केवळ डांबरीकरण, सिमेंट काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून खडड्य़ांना मुड्मा देण्याचे निश्चित केले आहे. मागीलवर्षी जेट पॅचिंगचा आधार घेतला गेला होता. मागीलवर्षी खड्डे बुजविण्यासाठी दोन कोटींच्या आसपास निधी खर्च केला होता. यंदा त्यात वाढ करून तो खर्च अडीच कोटींचा केला आहे.

ठाणे शहरात १२२२ खड्डे पडले असून, त्यातील १५५७ खड्डे भरल्याचा दावा पालिकेने केला आहे. शहरातील रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, यासाठी मागील काही वर्षांत रस्त्यांवर विविध प्रयोग करून तीन वर्षे या रस्त्यांना काहीही होणार नसल्याचा केला होता. परंतु तो फोल ठरला आहे. त्यामुळे यंदा गुगल मॅपिंगद्वारे खड्डे बुजविले आहेत.

या पद्धतीने बुजविले खड्डे

ठाणे महापालिकेने यंदा डब्ल्यूबीएम, काँक्रिट, डांबरीकरण आदी पद्धतीने भरले आहेत.

कळवा - मुंब्य्रातही खड्डे

कळवा आणि मुंब्य्रात मागील काही वर्षांत नव्याने रस्ते तयार केले आहेत. येथील बहुतेक ठिकाणी सिमेंट काँक्रिटचे रस्ते केले आहेत. त्यामुळे मागील दोन वर्षे येथे खड्डे नसल्याचेच चित्र होते. यंदा मात्र या भागातही खड्डे दिसून आले. सर्व्हेत कळव्यात ११८ आणि मुंब्य्रात १३१ खड्डे पडलेले आहेत.

प्रभाग समितीनिहाय खड्ड्यांची यादी

प्रभाग समिती - पडलेले खड्डे - बुजविलेले खड्डे - शिल्लक खड्डे

नौपाडा-कोपरी - ७७ - ७१ - ६

उथळसर - २१२ - २०८ - ४

कळवा - ११८ - ११६ - २

मुंब्रा - १३१ - १२५ - ६

वागळे - ४३ - ४१ - २

वर्तकनगर - २८० - २७६ - ४

दिवा - १४४ - १२१ - २३

माजिवडा-मानपाडा - ११८ - १०८ - १०

लोकमान्य- सावरकर - ९९ - ९१ - ८

---------------------------------------------------------------------------

एकूण - १२२२ - ११५७ - ६५

Web Title: The basis of Google mapping for filling pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.