रंगली श्रेयवादाची लढाई, सोशल मीडियावर संदेश पाठवून दिले एकमेकांना उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 07:09 AM2018-01-30T07:09:44+5:302018-01-30T07:09:55+5:30
शहरात बाहेरून येणाºया वाहनांमुळे होणाºया कोंडीतून सुटका मिळावी, यासाठी उड्डाणपुलांच्या सुरू असलेल्या कामांची शिवसेना खा. राजन विचारे यांनी सोमवारी पाहणी केली. लागलीच ठाणे शहरातील भाजपाचे आ. संजय केळकर यांनी गेल्या चार महिन्यांत दोन वेळा या कामांची पाहणी केल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली.
ठाणे : शहरात बाहेरून येणाºया वाहनांमुळे होणाºया कोंडीतून सुटका मिळावी, यासाठी उड्डाणपुलांच्या सुरू असलेल्या कामांची शिवसेना खा. राजन विचारे यांनी सोमवारी पाहणी केली. लागलीच ठाणे शहरातील भाजपाचे आ. संजय केळकर यांनी गेल्या चार महिन्यांत दोन वेळा या कामांची पाहणी केल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली. त्यामुळे या उड्डाणपुलांच्या उभारणीचा श्रेयवाद येत्या काही दिवसांत कसा रंगणार, याची चुणूक सोमवारी अनुभवण्यास मिळाली.
मीनाताई ठाकरे चौकामधून जाणाºया उड्डाणपुलाच्या आराखड्यात बदल करून हे सलग पूल दोन दिशांना उतरणार आहेत. हा पूल ३१ मे पर्यंत सुरू करण्यात येणार आहे.
अल्मेडा चौक येथील हा पूल ६३६ मीटरचा असून या उड्डाणपुलाच्या कामात वंदना डेपोजवळ येथे अप व डाउन दिशेला असणाºया विकास आराखड्यातील रस्त्याच्या रु ंदीकरणाचे काम तत्काळ सुरू करावे, असे आदेश खा. विचारे यांनी नगर अभियंता यांना दिले. हा पूल ३१ मार्चपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. संत नामदेव चौक येथील हा पूल ६४७ मीटर लांबीचा असून याठिकाणीसुद्धा विकास आराखड्यात असणाºया रस्त्याच्या रु ंदीकरणाचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. हा पूल ३० एप्रिलपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. खा. विचारे यांनी कोपरी पुलाची चौकशी केली असता या पुलाच्या निविदा सोमवारीच उघडण्यात येणार असून पात्र ठरणाºया ठेकेदारास १५ दिवसांत कार्यादेश देणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.
कोपरी पुलाचे काम सुरू झाल्यास या पुलावरून ये-जा करणारी वाहने शहरातील तिन्ही उड्डाणपुलांवरून ठाणे-कोपरी पुलाद्वारे सर्व्हिस रोडमार्गे हायवे पूर्व द्रुतगती मार्गाला जोडण्यात येणार आहेत. या प्रकल्पामध्ये भूमिगत जलवाहिनी, ‘महावितरण’च्या उच्चदाबाच्या वाहिन्या, मलवाहिन्या यांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावे लागले. काही ठिकाणी स्थलांतर करणे शक्य नसल्याने पुलाच्या पायाच्या संकल्प चित्रामध्ये आवश्यक फेरबदल करून काम करण्यात आल्याचे खा. विचारे यांनी सांगितले.
या उड्डाणपुलाच्या कामाला २०१४ साली मंजुरी मिळाली असून याला एमएमआरडीएकडून २२३ कोटींचे अर्थसाहाय्य प्राप्त झाले आहे. हे काम महापालिकेमार्फत सुरू आहे.
शिवसेना - भाजपाची अहमहमिका
च्सोमवारी सकाळी खा. विचारे यांनी केलेल्या या पाहणीचे फोटो व बातमी सोशल मीडियावर प्रसृत होताच आ. संजय केळकर यांनी याच उड्डाणपुलांच्या कामांची गेल्या चार महिन्यांत दोन वेळा पाहणी केल्याची वृत्ते सोशल मीडियावर प्रसृत केली गेली.
च्हे पूल उभारले जाण्याकरिता आम्हीच कसा पाठपुरावा केला, हे सांगण्याची अहमहमिका शिवसेना व भाजपात सुरू झाली.
च्विचारे व केळकर यांच्या स्वीय सहायक यांच्यातील ही जुगलबंदी निवडणुका जवळ येताच कामांचे श्रेय घेण्यावरून या दोन्ही पक्षांत कसे तुंबळ युद्ध होणार, याची साक्ष देणारी होती.
च्नंतर मात्र, दोन्ही नेत्यांच्या सहायकांनी हा श्रेय घेण्याचा प्रयत्न नसल्याचा खुलासा केला.