रेल्वे उड्डाणपुलावरून श्रेयवादाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:11 AM2018-03-28T00:11:02+5:302018-03-28T00:11:02+5:30

भाजपा-शिवसेना या सत्ताधारी पक्षांमध्ये युतीचा पूल उभारण्याकरिता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न

Battle of Shreywada on Railway Flyover | रेल्वे उड्डाणपुलावरून श्रेयवादाची लढाई

रेल्वे उड्डाणपुलावरून श्रेयवादाची लढाई

Next

डोंबिवली : भाजपा-शिवसेना या सत्ताधारी पक्षांमध्ये युतीचा पूल उभारण्याकरिता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरु झाले असतानाच डोंबिवलीत मात्र पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाच्या लोकार्पण सोहळ््यावरुन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात श्रेयवादाची लढाई उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.
डोंबिवलीतील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वे व महापालिकेने पुढाकार घेऊन स. वा. जोशी व ठाकूर्ली ५२ चाळ या दोन्ही भागाकडे उतरणारा रेल्वे उड्डाणपूल तयार करण्याचे काम हाती घेतले. डोंबिवलीचा कोपर पूल हा जुना झाला असून तो अरुंद आहे. त्यामुळे कोपर पुलास पर्याय प्राप्त होणार आहे. १२ कोटी रुपये खर्च करुन १७० टन वजनाचे दोन गर्डर सप्टेंबर २०१७ मध्ये टाकण्यात आले. गर्डर टाकण्याचा खर्च महापालिका व रेल्वे यांनी निम्मानिम्मा केला. हा पूल २०१७ च्या दिवाळीत वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे सूतोवाच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले होते. या कामाची चव्हाण व खा. शिंदे यांनी पाहणी केली होती. ठाकूर्लीच्या बाजूने व स.वा. जोशी शाळेच्या बाजेने पोहच रस्ता तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. एप्रिल महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाण्याचे सांगण्यात येते. मात्र उदघाटनाची तारीख नक्की केली जात नाही. कारण पुलासाठी चव्हाण व शिंदे यांनी दोघांनी प्रयत्न केल्याने कामाच्या श्रेयाची लढाई रंगण्याची दाट चिन्हे आहेत.
पूलावर दोन गर्डर असून एक मार्ग पूर्वेकडे जाण्यासाठी व एक पश्चिमेकडे येण्यासाठी आहे. मात्र दोन्ही गर्डरची रुंदी अरुंद असल्याने त्यावरुन बसगाड्यांची वाहतूक होणार किंवा कसे अशी शंका व्यक्त केली जात आहे. पुलावरुन बसगाड्या जाण्यात अडथळा येणार असेल तर पूल उभारुनही उपयोग होणार नाही. पुलावरुन केवळ दुचाकी, तीनचाकी वाहने मार्गक्रमण करु शकतील, असा अंदाज आहे. त्यामुळे ज्याला डोंबिवली पश्चिमेत नव्या रेल्वे उड्डाणपूलावरुन जायचे झाल्यास त्याला ठाकूर्ली व गणेश मंदिरच्या येथून पूलावरुन जावे लागेल तर ठाकुर्ली व डोंबिवली पश्चिमेतून पूर्वेत जाण्यासाठी स. वा. जोशी शाळेच्या पुढून गणेश मंदिर मार्गे बाहेर पडावे लागणार आहे. परिणामी नवा रेल्वे उड्डाणपूल हा वाहतूक कोंडी सोडवण्याऐवजी कोंडीत भर घालणारा ठरेल, असे जाणकारांचे मत आहे. डोंबिवली स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीचा ताण नव्या रेल्वे उड्डाणपूलावर जाईल. त्यामुळे गणेश मंदिर परिसर व ठाकूर्ली समांतर रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ शकते. ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पूर्वेकडील बाजू तसेच पुढे समांतर रस्त्याकडे जाताना अरुंद चौकात वाहतूक कोंडीत भर पडणार आहे.
यापूर्वीही महापालिकेने कल्याण आग्रा रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गोविंदवाडी बायपास तयार केला. गोविंदवाडी बायपासमुळे कल्याण पत्री पूलावर वाहतुकीचा ताण येऊन वाहतूक कोंडीचे नवे जंक्शन कल्याण पत्री पूल येथे तयार झाले आहे. त्याचबरोबर कल्याण विठ्ठलवाडी दरम्यान एफ केबीनवरील रेल्वे उड्डाणपुलामुळे कल्याण उल्हासनगरला जोडणाºया रेल्वे उड्डाण पूल वाहतूककोंडीचे जंक्शन झाला आहे.

Web Title: Battle of Shreywada on Railway Flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.