पशू - पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी शहरात लागल्या सामूहिक पाणपोई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 09:59 PM2018-03-30T21:59:26+5:302018-03-30T21:59:26+5:30

आता पासुनच उष्णतेच्या झळा आंगाची काहिली करु लागल्या आहेत. माणुस कुठुनही पिण्यााठी स्वच्छ पाण्याची सोय करु शकतो. पण मुक्या पशु - पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी काही श्वानप्रेमींनी पाणी साठवणीची सिमेंट भांडी श्रमदानाने शहरात लावली आहेत.

Beasts - The collective waterscapes in the city are used to raise the thirst of the birds | पशू - पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी शहरात लागल्या सामूहिक पाणपोई

पशू - पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी शहरात लागल्या सामूहिक पाणपोई

googlenewsNext

मीरारोड - आता पासुनच उष्णतेच्या झळा आंगाची काहिली करु लागल्या आहेत. माणुस कुठुनही पिण्यााठी स्वच्छ पाण्याची सोय करु शकतो. पण मुक्या पशु - पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी काही श्वानप्रेमींनी पाणी साठवणीची सिमेंट भांडी श्रमदानाने शहरात लावली आहेत. या पशु - पक्ष्यांसाठीच्या सामुहिक पाणपोर्इंचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबवला जात आहे.

शहरातील हॅण्ड फौंडेशन च्या वतीने
पहिल्यांदाच हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. या वेळी उन्हाळा तिव्र जाणवु लागलाय. पाण्याचे साठी झपाट्याने आटु लागले आहेत. शहरात देखील पाणी टंचाई सहन करावी लागत आहे. उष्म्या मुळे तहान वाढली आहे. माणुस पाणी पिण्याची सोय कशीही करु शकतो.

परंतु भटके श्वान, मांजर, खारुताई, चिमणी, कावळा, साळूंकी, कबुतर आदी विविध पशु व पक्ष्यांना मात्र तहान भागवण्यासाठी शुध्द पाण्याची सोय तशी नसतेच. त्यातही वाढत्या गरमी मुळे त्यांची तहान देखील वाढते.

मग अशा पशु - पक्ष्यांसाठी आपण स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय कशी करु शकतो यावर संस्थेचे अध्यक्ष फ्रांसिस लोबो , सचीव रविंद्र भोसले, खजिनदार नंदिनी पानिकर,
संतोष मिश्रा, नामदेव काशिद, श्रृती सावंत, प्रमोद जैन आदींनी विचार विनीमय करण्यास सुरवात केली.

त्यातुन आपण शहरात आवश्यक अशी ठिकाणं निवडुन तेथे पिण्याच्या पाण्याची सोय करु शकतो असं ठरलं. सरीता रातुरी यांनी पाणी ठेवण्यााठी सिमेंटची घमेल्याच्या आकाराची भांडी देण्याची जबाबदारी घेतली.

पण भांडी लावल्या नंतर त्या मध्ये नियमीत पणे स्वच्छ पाणी टाकण्याच काम कसं करायचा असा प्रश्न पडला. पण तो प्रश्न देखील शहरातील पशुप्रेमींनी सोडवलाय.

शहरात अनेक भागात पशु व श्वान प्रेमी नागरीक राहतात. ते नित्यनेमाने या भटक्या श्वान आदिंना दूध, पाणी, अन्न देत असतात. त्यांची देखभाल व औषधोपचार सुध्दा करत असतात. त्यामुळे पाण्याच्या भांड्यां मध्ये नियमीत पाणी ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या कडे सोपवण्याची विचारणा केली गेली. आणि त्या पशुप्रेमींनी लागलीच ती जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली.

यंदाचा कडक उन्हाळा पाहता पहिल्यांदाच या सामुहिक पशु-पक्षी पाणपोईची संकल्पना राबवण्याचा विचार केला. शहरात आता पर्यंत २५ ठिकाणी आम्ही पाणी साठवणारी सिमेंटची भांडी लावलेली आहेत. नागरीकांनी देखील सहकार्य केले तर नियमीतपणे या भांड्यां मध्ये पाणी भरुन राहिल. जेणे करुन परिसरातील भटके श्वान, मांजर, गुरं - ढोरं सह अन्य पशु व पक्ष्यांची तहान आपण भागवु शकतो असं संस्थेचे म्हणणे आहे.

Web Title: Beasts - The collective waterscapes in the city are used to raise the thirst of the birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.