पाळीव श्र्वानाला बेदम मारहाण; एका पेट क्लिनिकमध्ये कर्मचाऱ्यांनी केली लाथा बुक्क्यांनी मारहाण

By प्रज्ञा म्हात्रे | Published: February 13, 2024 02:37 PM2024-02-13T14:37:36+5:302024-02-13T14:37:51+5:30

हा व्हिडिओ व्हायरल होतास प्राणी मित्र संघटना आणि प्राणी मित्रांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. ए

Beating a pet dog; In a pet clinic, the staff kicked and beat them with sticks | पाळीव श्र्वानाला बेदम मारहाण; एका पेट क्लिनिकमध्ये कर्मचाऱ्यांनी केली लाथा बुक्क्यांनी मारहाण

पाळीव श्र्वानाला बेदम मारहाण; एका पेट क्लिनिकमध्ये कर्मचाऱ्यांनी केली लाथा बुक्क्यांनी मारहाण

ठाणे: ठाण्यातील एका पेट क्लिनिकमध्ये एका पाळीव श्र्वाणाला या क्लिनिक मधील दोन कर्मचारी लाथा बुक्क्यांनी मारत असल्याचा व्हिडिओ संपूर्ण भारतभर वायरल झाल्याने या व्हिडिओची दखल घेत पॉज या प्राणीमित्र संस्थेने या कर्मचाऱ्यांविरोधात एफ आय आर दाखल करण्याची मागणी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकाऱ्यांना ईमेल द्वारे केली आहे.

हा व्हिडिओ व्हायरल होतास प्राणी मित्र संघटना आणि प्राणी मित्रांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. एका क्लिनिकमध्ये या श्वानाला मारहाण करत आहेत आणि त्यांनीच हा व्हिडिओ शूट करून फेसबुक वर टाकला आहे अशी माहिती पॉज या संस्थेचे निलेश भणगे यांनी लोकमतला माहिती देताना सांगितले. 24 तासांच्या आत या व्हिडिओची गंभीर दखल घेत या कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर सर्व प्राणी मित्र रस्त्यावर येतील असा इशारा देखील भणगे यांनी दिला आहे. तसेच या क्लिनिकच्या बाहेर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असेही त्यांनी या इशाऱ्यात म्हटले आहे. भनगे म्हणाले की, पॉज संस्थेने महाराष्ट्र ॲनिमल वेल्फेअर बोर्ड, ठाणे सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ कृएलती टू अनिमल्स , ठाणे जिला अधिकारी , ठाणे हेल्थ ऑफिसर ह्यांना त्वरीत कारवाई करणयासाठी मागणी केली आहे.

Web Title: Beating a pet dog; In a pet clinic, the staff kicked and beat them with sticks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे