उल्हासनगरातील रस्ते दुभाजक व भिंतींना रंगरंगोटी; चौकाचेही सुशोभीकरण व वृक्षारोपण
By सदानंद नाईक | Published: January 29, 2024 04:44 PM2024-01-29T16:44:13+5:302024-01-29T16:44:43+5:30
महापालिकेच्या या आगळीवेगळ्या उपक्रमाने शहराच्या सोंदर्यात भर पडली आहे.
सदानंद नाईक, उल्हासनगर : शहराचे रुपडे बदलण्यासाठी रस्ते दुभाजकांची रंगरंगोटी, भिंतीवर पर्यावरण विषयक चित्रे, चौकाचे सुशोभीकरण आदी कामे महापालिकेने सुरू केल्याची माहिती उद्यान अधीक्षक दीप्ती पवार यांनी दिली. महापालिकेच्या या आगळीवेगळ्या उपक्रमाने शहराच्या सोंदर्यात भर पडली आहे.
उल्हासनगरात हजारो कोटीच्या निधीतून विविध विकास कामे सुरू असून शिवसेना शिंदे गट व भाजपच्या नेत्याच्या टेंडर घोटाळ्याच्या आरोप प्रत्यारोपावरून शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे शहर सोंदर्यात भर घालण्यासाठी महापालिका आगळावेगळा उपक्रम राबवित आहे. शहरातील रस्ते दुभाजकांची रंगरंगोटी करण्यात येत असून दुभाजकां मध्ये विविध जातीचे रंगेबेरंगी फुलांचे व शोभेचे झाडे लावण्यात येत आहे. रस्ते बाजूच्या भिंती पर्यावरणपूरक चित्रांनी रंगवीत असून चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले. या कामामुळे रस्ते व चौक उजळून निघाले असून शहरातील भिंतींवर विविध सामाजिक पर्यावरण पूरक तसेच शहरात वाचन संस्कृतीची जपणूक व्हावी. याकरिता संतांच्या कविता भिंतीवर साकारण्यात आल्या आहेत. आदी अनेक उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव व उद्यान अधिक्षक दिप्ती पवार यांनी दिली.
महापालिकेने शहर सोंदर्यात भर घालण्यासाठी इमारत सोसायटींच्या भिंती, सरकारी इमारतींच्या भिंती, पाण्याच्या मोठ्या टाक्या आदिवर आकर्षक चित्रे काढण्यात येत आहे. तसेच शाळा, महाविद्यालये याबाहेरील भिंतीवर शिक्षणाशी संबंधित विषय, उद्यानाबाहेरील भिंतीवर खेळ आणि पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे चित्र, रुग्णालयबाहेरील भिंतीवर स्वछता व आरोग्य सेवा यासंबंधीची जाणीव करुन देणारी चित्रे काढण्यात आली आहे. असे विविध उपक्रम राबवून शहर कसे सुंदर दिसेल. यातून प्रयत्न करीत असल्याची माहिती पवार यांनी दिली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून शहरातील नागरिकांमधे शहराविषयी सकारात्मकता भावना निर्माण होईल. असेही त्यांचे म्हणणे आहे.