उद्या रंगणार लोकमत महामॅरेथॉनचा बीब एक्स्पो; धावपटूंचा उत्साह शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 11:30 AM2023-12-01T11:30:30+5:302023-12-01T11:32:56+5:30
Mahamarathon : लोकमत महामुंबई ठाणे महामॅरेथॉनचा बीब एक्स्पो शनिवार, २ डिसेंबरला ठाण्यातील सिंघानिया शाळेमागील रेमंड ट्रेड शोच्या कन्व्हेन्शन हॉलमध्ये सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत रंगणार आहे.
ठाणे - लोकमत महामुंबई ठाणे महामॅरेथॉनचा बीब एक्स्पो शनिवार, २ डिसेंबरला ठाण्यातील सिंघानिया शाळेमागील रेमंड ट्रेड शोच्या कन्व्हेन्शन हॉलमध्ये सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत रंगणार आहे. सकाळी ११:०० वाजता विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.
कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, महामॅरेथॉनच्या संस्थापिका - संचालिका रुचिरा दर्डा, एमसीएचआयचे जितेंद्र मेहता यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनप्रसंगी महानगर गॅस लि.चे निरा अस्थाना, रुस्तोगी आरंभ ग्रुपचे संजय गुप्ता, ब्लॉसम रेडी टू इट ग्रुपचे आनंद ठक्कर, युनियन बँकेच्या ठाणे शाखेच्या सी. एस. जननी, कॅन्सर कंट्रोल मिशन एनजीओचे पुष्केंद्र राज, टीप टॉप प्लाझाचे जयदीप शहा आणि कार्तिक शहा, किक-इव्हीचे सागर जोशी आणि तुषार खैर, टोटल स्पोर्ट्स अँड फिटनेसचे रवींद्र साळुंखे, लायन ताराचंद बाप्पा हॉस्पिटल आणि रिसर्चचे डॉ. सुहास देसाई आणि त्यांच्या पत्नी, जिक्सा स्ट्राँगचे नितीश पांडे आणि अमित गंगापूरकर, फूड स्टाँगचे अवर्तन बोकील आणि सार्थक वाणी, रौनक ॲडव्हर्टायझिंगचे अमरदीप सिंह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर रुचिरा दर्डा या धावपटूंना संबोधित करणार आहेत.
सहभागी धावपटूंना टीशर्ट, गुडी बॅग, विविध कूपन्स देण्यात येतील. सकाळी १०:०० वाजता बीब एक्स्पोला येणाऱ्या धावपटूंचे स्वागत हाेईल. दिवसभरात सहभागी धावपटूंसाठी मॅरेथॉनचे मेंटॉर्स सतीश गुजरान, हरिदास नायर, गिरीश बिंद्रा, बिजू नायर तसेच, आरोग्यविषयक माहिती देण्यासाठी आहारतज्ज्ञ आणि मान्यवर डॉक्टर्स उपस्थितांशी संवाद साधतील. त्यानंतर मॅरेथॉन मार्गावरील सोयी - सुविधांची माहिती देण्यात येईल. महामॅरेथॉनला सहकार्य करणारे प्रायोजक मॅरेथॉनबद्दल मनोगत व्यक्त करतील. रिलॅक्स झीलच्या फिटनेस कोच पेसर्सशी संवाद साधतील. धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी मॅरेथॉन अँथमवर राज वनमाळी ग्रुपच्या वतीने नृत्य, झुम्बा, रॉक बँडचे सादरीकरण होणार आहे.