अभिनय कट्टा लसीकरण मोहिमेस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:46+5:302021-06-17T04:27:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आदित्य प्रतिष्ठानच्या वुई फॉर यू आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १८ ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आदित्य प्रतिष्ठानच्या वुई फॉर यू आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. बुधवारपासून या मोहिमेस प्रारंभ झाला. या मोहिमेला महापौर नरेश म्हस्के यांनी देखील भेट दिली.
यावेळी अभिनय कट्ट्यावर लसीकरण मोहिमेसाठी सायकलीवर बसलेला एक टेडीबेअर ठेवला आहे. तो कोरोनाची लस घेतल्याचा आनंद व्यक्त करत आहे. लस घेतल्यानंतर आनंदी असलेल्या दहा चेहऱ्यांची निवड आदित्य प्रतिष्ठान करणार असून, त्यांना हॅपी फेस या स्पर्धेअंतर्गत बक्षिसे देण्यात येणार असल्याचे किरण नाकती यांनी सांगितले. याप्रसंगी ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील रूपाली भोसले, अभिषेक देशमुख यांनादेखील लस देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक भास्कर पाटील, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल गिते उपस्थित होते.
----------------------------------------
१. लसीकरणासाठी प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांचे मनोरंजन अभिनय कट्ट्याच्या संगीत कट्ट्याचे कलाकार करीत होते.
२. दिव्यांग कला केंद्राच्या काही दिव्यांगांना लस देण्यात आली.
----------------------------------------