पारसिक बोगद्यावरील कचरा हटवण्यास अखेर सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:00 AM2018-09-15T03:00:34+5:302018-09-15T03:00:50+5:30
कित्येक वर्षे पारसिक बोगद्यावर साचलेला कचरा अखेर ठाणे महापालिकेने जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून काढण्यास सुरुवात केली आहे
ठाणे : कित्येक वर्षे पारसिक बोगद्यावर साचलेला कचरा अखेर ठाणे महापालिकेने जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून काढण्यास सुरुवात केली आहे. आठ दिवसांत हा बोगदा स्वच्छ झालेला दिसेल, असा दावा पालिकेने केला आहे. वाघोबा, भास्करनगरच्या मधल्या जागेत लहान मुलांसाठी एक उद्यानही येथे भविष्यात साकारले जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी दिली.
भास्करनगर व वाघोबानगरला जोडणारा पारसिक बोगदा हा महत्त्वाचा दुवा ठरत आहे. या दोन्ही भागांत झोपड्यांचे साम्राज्य अधिक आहे. याच झोपडपट्टी भागातून निर्माण होणारा कचरा हा पारसिक बोगद्यावर टाकला जात होता. मागील कित्येक वर्षांपासून या बोगद्यावरील बाजूही कचऱ्याने भरलेली होती. त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्यही येथे होते. काही वेळेस किरकोळ आगीच्या घटनाही या ठिकाणी घडल्या होत्या. या कचºयाचा बाजूने जाणाºया रेल्वेस त्रास होत होता. यामुळेच ही समस्या मार्गी लावण्यासाठी स्थानिक नगरसेवक महेश साळवी व इतर नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती. तसेच पाटील यांनीसुद्धा पाठपुरावा केला होता. परंतु, हा कचरा हटवण्यासाठी साधे तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार नव्हते. आता ही समस्या सुटली असून जर्मन तंत्रज्ञानाचे मशीन पालिकेच्या ताफ्यात समाविष्ट झाले आहे. त्याच्याच साहाय्याने १३ सप्टेंबरपासून तो उचलण्यास सुरुवात झाली आहे. बोगद्यावरील हा कचरा उचलल्यानंतर या भागात लहान मुलांसाठी एक उद्यान तयार करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच भास्करनगर आणि वाघोबानगर भागातील रहिवाशांना येजा करणेही सुसह्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या आठ दिवसांत ही मोहीम पार पाडण्यासाठी उपायुक्त मनीष जोशी, बालाजी हळदेकर विशेष लक्ष ठेवून आहेत.
भास्करनगर आणि वाघोबानगरला जोडणारा पारसिक बोगदा हा महत्त्वाचा दुवा ठरत आहे. या दोन्ही भागांत झोपड्यांचे साम्राज्य अधिक आहे. याच झोपडपट्टी भागातून निर्माण होणारा कचरा हा पारसिक बोगद्यावर टाकला जात होता. रेल्वे प्रवाशांना व परिसरातील नागरिकांना कचºयाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत होता.