कोमसापच्या वतीने मुंबई, ठाणे जिल्ह्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आणि संवाद लेखन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 03:41 PM2018-08-08T15:41:39+5:302018-08-08T15:47:03+5:30

कोमसापच्या वतीने मुंबई, ठाणे  जिल्ह्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आणि संवाद लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

On behalf of Kamsapa, Oratory competitions and dialogue writing competitions for Mumbai, Thane district | कोमसापच्या वतीने मुंबई, ठाणे जिल्ह्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आणि संवाद लेखन स्पर्धा

कोमसापच्या वतीने मुंबई, ठाणे जिल्ह्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आणि संवाद लेखन स्पर्धा

googlenewsNext
ठळक मुद्देकोमसापच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा आणि संवाद लेखन स्पर्धा मुंबई, ठाणे जिल्ह्यासाठी स्पर्धा विजेत्यांना रोख पारितोषिक, पुस्तकभेट, प्रमाणपत्र

ठाणे : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मरणदिनाचे औचित्य साधून  कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती मुंबई - ठाणे आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई, ठाणे  जिल्ह्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आणि संवाद लेखन या दोन स्पर्धां आयजित करण्यात येत आहे. 

यातील वक्तृत्व स्पर्धा दिनांक २२ ऑगस्ट रोजी एम एच हायस्कूल , ठाणे येथे दुपारी १ वाजता घेण्यात येणार आहे अशी माहिती कोमसापने दिली. दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक, पुस्तकभेट, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे अशी माहिती कोमसापच्या प्रा. दीपा ठाणेकर यांनी दिली. स्पर्धेचे नियम आणि तपशील माहितीसाठी दिलेल्या संपर्क क्रमांकावर व्हाट्सअप वरून संपर्क साधावा असे आवाहन  कोमसापने केले आहे. 

वक्तृत्व स्पर्धा - गट १ -  ( माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गट - इयत्ता -  नववी ते बारावी ) 

१ -  सारे भारतीय माझे बांधव आहेत ?  

२ -  मालिकांमधील दाखवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा आणि समाज  

३ -  स्मार्ट फोनच्या जमान्यात माणसं विचारांनी स्मार्ट झालीत का ? 

४ -  आवरा त्या प्लास्टिकच्या विळख्याला. 

५ -  आर्थिक निकषावर आधारित आरक्षणाची गरज.   

संपर्क क्रमांक - ९८७०५ ८८६८२  

वक्तृत्व स्पर्धा - गट २ - ( पदवी गट  - प्रथम वर्ष  ते तृतीय वर्ष कला , वाणिज्य , विज्ञान , अभियांत्रिकी, मेडिकल 

वा अन्य शाखा BMS BMM )

 १)   डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी  भारतीय समाजासाठी दिलेले योगदान

२)   डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ग्रंथसंपदा 

३ )  कधी साकारेल का आरक्षण विरहित भारत ?  

४)   जातीसाठी घालवावा का जीव आपला ? 

५)   होय , भावना डिजिटल होतायत..

संपर्क क्रमांक - ८८९८५ ५३४९५ 

 

संवाद लेखन स्पर्धा : गट १ == ( माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गट - इयत्ता -  नववी ते बारावी ) 

१ -   जातीविरहित भारत  याबाबत  भारतमाता आणि भारतीय नागरिक यांच्यातील संवाद 

२ -   कोणत्याही प्रवेश अर्जामध्ये  जात धर्म याबाबत होणा-या उल्लेखाबाबत मित्र मैत्रिणींमधील संवाद

३ -   गावातील बळी प्रकार थांबविण्याबाबत गावातील प्रतिष्ठित मांत्रिक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य यांच्यातील संवाद. 

४ -   प्लास्टिक बंदीबाबत सकारात्मक - नकारात्मक विचार करणाऱ्या तरुणांतील संवाद. 

५ -   व्हाटसपवर येणाऱ्या संदेशापाठीमागे असणारी प्रचंड कल्पनाशक्ती याबाबत मित्र मैत्रिणींमधील संवाद. 

संपर्कक्रमांक   -  ७७३८९ ५४७०८ 

संवाद लेखन स्पर्धा  =  गट २ - ( पदवी गट  - प्रथम वर्ष  ते तृतीय वर्ष कला , वाणिज्य , विज्ञान , अभियांत्रिकी, मेडिकल वा अन्य शाखा BMS BMM )

१)   देशाच्या अस्थिरतेबद्दल लढवय्या सैनिक आणि बळीराजा यांच्यातील संवाद.  

२ )  समाजाला पोखरणाऱ्या अंधश्रद्धेबद्दल श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील संवाद.

३)   आरक्षणासाठी होत असलेल्या आत्महत्यांंबाबत शिवाजी महाराज आणि मावळे यांच्यातील संवाद. 

४)   ढोलताशे बडवणारी संस्कृती निर्माण होतेय याबाबत ज्येष्ठ नागरिक आणि युवावर्गाशी संवाद. 

५)   करिअरच्या वाटेवर शिक्षण मूल्यांचा अभाव असलेली पिढी जन्माला येतेय याबाबत समाजसुधारकांचा तरुणांशी झालेला संवाद . 

संपर्क क्रमांक - ८१०८२ ४७०७४ 

स्पर्धेचे  नियम : 

वक्तृत्व स्पर्धेसाठी नियम : 

१ -  कोणत्याही स्पर्धेत एका शाळेचे वा महाविद्यालयाचे २ स्पर्धक असावेत.  

२ -  वक्तृत्व स्पर्धेसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक साठी ५ मिनिटे तर पदवीसाठी ७ मिनिटांचा कालावधी आहे..

३ -  स्पर्धेच्या वेळी स्पर्धकाकडे शाळेचे महाविद्यालयाचे ओळखपत्र आवश्यक आहे. 

४ -  स्पर्धेसाठी स्पर्धकांनी आपली नावे - 

माध्यमिक - उच्च माध्यमिकगटासाठी ( शुभांगी विरकर -९८७०५ ८८६८२ ) 

पदवीगटासाठी ( कमलेश भिसे ८८९८५ ५३४९५ ) 

यांच्याकडे व्हाटसपवर २० ऑगस्ट पर्यंत द्यावीत. त्यानंतर नावनोंदणी करायची असल्यास याच समन्वयकांशी संपर्क साधावा. 

संवाद लेखनासाठी नियम : 

१ - संवाद लेखन इमेल वर पाठवायचे आहे -  

वैभव   मेल आणि नंबर - ७७३८९ ५४७०८   vpadave7@gmail.com   

रुपाली  मेल आणि नंबर - ८१०८२ ४७०७४  rupalipinjan@gmail.com  

२ -  मेलवर संवादलेखन पाठवताना ते टाईप केलेले असले तर उत्तम... पण त्यासोबत font ही पाठवावा.

३ -  जर टाईप करुन पाठवता येणे शक्य नसेल तर उत्तम हस्ताक्षरात कागदावर लिहून त्याचा क्लिअर फोटो पाठवावा.

४ -  संवादलेखन करताना चार पेक्षा जास्त पात्र नसावीत.

५ -  माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांच्यासाठी २०-२५ संवाद असावेत.

तर पदवीगटासाठी ३०-३५ संवाद असावेत. साधारण ३-४ फुलस्केप असावेत. 

६ -  संवाद पाठविण्याची अंतिम तारीख १८ आँगस्ट आहे.. त्यानंतर पाठवायचे असल्यास संबंधित समन्वयकाशी संपर्क साधावा.

७-   संवादलेखन पाठवताना त्यासोबत विद्यार्थ्याचे नाव , पत्ता, शाळा / महाविद्यालयाचे नाव, वर्ष, इयत्ता, संपर्क नंबर , पाठवणे अत्यावश्यक आहे..

८-   काही शंका असल्यास दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा किंवाdeepathanekar73@gmail.com या मेलवर शंका विचाराव्यात. 

Web Title: On behalf of Kamsapa, Oratory competitions and dialogue writing competitions for Mumbai, Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.