मतदानावरील बहिष्कार मागे
By admin | Published: October 27, 2015 12:14 AM2015-10-27T00:14:21+5:302015-10-27T00:14:21+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने २७ गावांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच टिटवाळ्याजवळच्या आंबिवली व बल्याणी या दोन गावांमधील ग्रामस्थांनी
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने २७ गावांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच टिटवाळ्याजवळच्या आंबिवली व बल्याणी या दोन गावांमधील ग्रामस्थांनी शिवसेना नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून मतदानावरील बहिष्कार मागे घेतला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका स्थापन झाल्यानंतर गेली १४ वर्षे या दोन गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.
यंदाही ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रविवारी ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी ठाणे जिल्हाप्रमुख (ग्रामीण) प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, महानगरप्रमुख विजय साळवी आदी उपस्थित होते. महापालिकेच्या माध्यमातून या गावांमध्ये आवश्यक त्या सर्व नागरी सुविधा पुरवण्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली. तसेच, जे काही प्रलंबित प्रश्न असतील, तेही प्राधान्याने सोडवण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर, ग्रामस्थांनी शिवसेना नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून मतदानावरील बहिष्कार मागे घेतला.