कर्जबाजारीपणाला कंटाळून सुताराची खाडीत उडी घेऊन आत्महत्या; फादर्स डेला मुले पाेरकी
By जितेंद्र कालेकर | Published: June 16, 2024 08:17 PM2024-06-16T20:17:31+5:302024-06-16T20:19:52+5:30
कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा: शोध कार्य राबवून अग्निशमन दलाने खाडीतून काढला मृतदेह
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: दोन खासगी वित्तीय संस्थांचे कर्ज झाल्याने त्याची परतफेड कशी करायची या विवंचनेत असलेल्या श्रवण उर्फ बबलू विश्वकर्मा (३५, रा. इंदिरानगर, वागळे इस्टेट, ठाणे) या फर्निचर दुरुस्ती करणाऱ्या कारागिराने साकेत जवळील खाडीत स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सात ते आठ तास खाडीच्या पाण्यात शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.
कळव्याच्या साकेत ब्रिजवर स्वत:ची मोटारसायकल उभी करुन नंतर त्याच ब्रिजवरुन खाली खाडीच्या पाण्यात बबलू याने १५ जून रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास उडी ष्घेतली. ही माहिती कळवा पोलिसांकडून मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाºयांकडून रात्री ७ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास खाडीच्या पाण्यात शोध कार्य राबविण्यात आले. मात्र, रात्रीचा अंधार असल्याने खाडीमध्ये शोधकार्य करणे
शक्य नसल्याने शनिवारी रात्री हे शोधकार्य तात्पुरते थांबविण्यात आले होते. त्यानंतर १६ जून रोजी सकाळी ७ ते ११ वाजण्याच्या दरम्यान पुन्हा चार तास शोधकार्य राबविण्यात आले. नविन कळवा ब्रिजजवळ अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांना त्याचा मृतदेह आढळला. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
फादर्स डेला मुले झाली पित्याला पाेरकी-
शनिवारी उडी घेण्यापूर्वी बबलू याने कर्जामुळे पत्नी रिंकू (३०) हिच्याजवळ हतबलता व्यक्त केली होती. यात दोष्घांमध्ये वादही झाला होता. त्यांना एक १५ वर्षांचा मुलगा आणि १२ वर्षांचे मुलगा आणि एक मुलगी ही जुळी अशी तीन मुले आहेत. जगभरात रविवारी फादर्स डे साजरा हाेत असतांना बबलूची मुले मात्र त्यांच्या पित्याला पाेरकी झाल्याचे हळहळ व्यक्त हाेत आहे.