खवय्यांसाठी बेल्जियम चॉकलेट बर्फी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:43 AM2018-11-01T00:43:58+5:302018-11-01T00:44:22+5:30

शुगर फ्री बर्फी मोठ्या प्रमाणात; गिफ्ट देण्यासाठी ड्रायफ्रुट्स मिठाईला मागणी

Belgian Chocolate Barfi for Khawiye | खवय्यांसाठी बेल्जियम चॉकलेट बर्फी

खवय्यांसाठी बेल्जियम चॉकलेट बर्फी

Next

- प्रज्ञा म्हात्रे

ठाणे : ठाणेकरांचीदिवाळी यंदा आणखीन चवदार होणार आहे. मिठाईत नव्याने आलेल्या बेल्जियम चॉकलेट बर्फी आणि फॅन्सी काजूची चव खवय्यांना चाखायला मिळणार आहे. डाएट आणि मधुमेहग्रस्तांसाठी शुगर फ्री मिठाईसुद्धा यंदा भरपूर प्रमाणात आली आहे. घरगुती वापरासाठी मावा मिठाईला पसंती दिली जात असली, तरी गिफ्टसाठी ड्रायफ्रुट आणि काजू कतलीलाच प्राधान्य दिले जात आहे.
दिवाळीचा गोडवा वाढवण्यासाठी रंगीबेरंगी, चविष्ट मिठाई खवय्यांसाठी आल्या आहेत. दुकानदारांनी खास दिवाळीच्या मिठाईचे स्टॉल्स दर्शनी भागांत लावले आहेत. काजू आणि ड्रायफ्रुट्स मिठाईचा यंदा ट्रेण्ड अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे.

ड्रायफ्रुट्सचे स्टफिंग असलेल्या फॅन्सी काजू मिठाईत मँगो, सीताफळ, काजू कनक, चंद्रमणी, पेरू, केशर डिलाइट, टोवेल नट्स हे नवीन १५ प्रकार यंदा आले आहेत. आप्तेष्टांना, सहकाऱ्यांना, मित्रमैत्रिणींना गिफ्ट्स देण्यासाठी काजू रोल, अंजीर रोल, खजूर रोल या मिठाईला पसंती दिली जात आहे, असे टीपटॉप प्लाझाचे मालक रोहितभाई शहा यांनी लोकमतला सांगितले. काजू कतलीचा दिवाळीनिमित्त खप वाढला आहे. कलाकंद म्हणून ओळखल्या जाणाºया मिल्क बर्फीला दिवाळीनिमित्त मागणी भरपूर असल्याने ती या दिवसांत मोठ्या प्रमाणात तयार केली जाते, असेही त्यांनी सांगितले. डाएट करणाºयांसाठी शुगर फ्री मिठाईत काजू रोल्स आणि काजू कतली हे दोन प्रकार आले आहेत.

टनांवर होणार विक्री
यंदा संपूर्ण ठाण्यात २५ टनच्या आसपास मिठाईची विक्री होण्याची शक्यता आहे. मिठाईच्या वाढत्या दरामुळे अर्धा किलो खरेदी करणारे पाव किलोवर येतील, असे मिठाईविक्रेत्यांनी सांगितले.

गिफ्ट्स बॉक्स ठरत आहे ठाणेकरांचे आकर्षण
चविष्ट मिठाईला आकर्षित गिफ्ट्स बॉक्सचा साज चढवण्यासाठी ज्वेलरी गिफ्ट्स बॉक्स आले आहेत. पाव किलो ते एक किलो मिठाईसाठी हे बॉक्स आहेत.

मिठाई 15 टक्क्यांनी महाग
ड्रायफ्रुट, दूध, डिझेल, वाहतूक यांचा खर्च वाढल्याने याचा परिणाम मिठाईच्या दरांवर झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा १५ टक्क्यांनी मिठाई महाग झाली आहे, असे शहा यांनी सांगितले.

 

Web Title: Belgian Chocolate Barfi for Khawiye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.