लाभार्थ्यांना फेब्रुवारीत घरे

By admin | Published: January 12, 2017 07:08 AM2017-01-12T07:08:12+5:302017-01-12T07:08:12+5:30

बीएसयूपी योजनेतील एका आठ मजली इमारतीचे काम सात वर्षांपासून सुरू असून ते पूर्ण होत आले आहे.

Beneficiaries homes in February | लाभार्थ्यांना फेब्रुवारीत घरे

लाभार्थ्यांना फेब्रुवारीत घरे

Next

भार्इंदर : बीएसयूपी योजनेतील एका आठ मजली इमारतीचे काम सात वर्षांपासून सुरू असून ते पूर्ण होत आले आहे. त्यात एकूण ४ हजार १३६ पैकी १७९ लाभार्थ्यांना फेब्रुवारीत सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. परंतु, इमारतीतील १०० टक्के सदनिका लाभार्थी आदिवासींनाच मिळाव्यात, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केल्यामुळे सदनिकावाटपाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यापूर्वी या सदनिकांचे वाटप दिवाळीत होेणार होते. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे त्याचा मुहूर्त टळला. यंदा फेब्रुवारीत सदनिका देण्याचे निश्चित केले आहे. या सदनिकांचे वाटप लॉटरी पद्धतीने होणार आहे. २००९ मधील महासभेने काशिमीरा परिसरातील जनतानगर व काशीचर्च परिसरात बीएसयूपी योजना राबवण्यास मान्यता दिली. यात एकूण ४ हजार १३६ लाभार्थ्यांना सामावून घेण्यात आले. त्यात जनतानगरमधील ३ हजार ६६५ व काशीचर्चमधील ४७१ लाभार्थ्यांचा समावेश आहे.
सुरुवातीला या योजनेला स्थानिकांकडून तीव्र विरोध झाल्याने योजना रेंगाळली होती. त्याला अनेकदा मुदतवाढ मिळाल्यानंतर यंदाची मुदतवाढ मार्च २०१७ पर्यंत देण्यात आली आहे. सुमारे ३३० कोटींची योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागला. अखेर, २०१३ मध्ये लाभार्थ्यांनी जागा रिकामी करण्यास सुरुवात केल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. त्यात विकासकांनीही आर्थिक अडचणींमुळे योजना ताटकळत ठेवली होती. दरम्यान, वाढत्या महागाईमुळे योजनेचा खर्च वाढला. त्यामुळे पालिकेने एकूण जागेपैकी २५ टक्के जागा व्यावसायिक वापरासाठी विकसित करून योजनेचा खर्च भरून काढण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठवला. त्याच्या कामात बदल करून सुरुवातीला बांधण्यात येणाऱ्या प्रत्येकी आठ मजल्यांच्या २३ इमारतींऐवजी दोन आठ मजल्यांच्या इमारतींसह १६ मजल्यांच्या इमारती बांधण्याचे प्रस्तावित केले. त्याला मान्यता मिळाल्यानंतर प्रशासनाने जनतानगरमध्ये जुलै २०१५ मध्ये अर्धवट बांधकाम झालेली एक आठ मजली इमारत पूर्ण केली. या इमारतीतील एकूण १७९ सदनिकांचे वाटप यंदाच्या फेब्रुवारीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या इमारतीत ५० आदिवासी लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात आल्याचे पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Beneficiaries homes in February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.