‘महिला व बालविकास’च्या कर्मचाऱ्यांना ‘आश्वासित प्रगती’चा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:38 AM2021-03-25T04:38:53+5:302021-03-25T04:38:53+5:30

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास ...

Benefit of ‘Assured Progress’ to ‘Women and Child Development’ staff | ‘महिला व बालविकास’च्या कर्मचाऱ्यांना ‘आश्वासित प्रगती’चा लाभ

‘महिला व बालविकास’च्या कर्मचाऱ्यांना ‘आश्वासित प्रगती’चा लाभ

Next

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या सहायक बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिकांना १०, २०, ३० वर्षांच्या सेवेनंतर मिळणाऱ्या ‘आश्वासित प्रगती’ योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

मंगळवारी ३८ कर्मचाऱ्यांना हा आर्थिक लाभ दिल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बालविकास ) संतोष भोसले यांनी दिली. ज्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी नसल्याने आलेली मरगळ घालविण्यासाठी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा आर्थिक लाभ दिला जातो. शासनाने निर्गमित केलेल्या पात्रता, निकषाची पूर्तता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार हा लाभ दिला जातो. पात्र कर्मचाऱ्यांना ‘आश्वासित प्रगती’ योजनेचा लाभ मिळावा, यासाठी दांगडे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार विभागप्रमुख कार्यवाही करत असून, आगामी काळात इतर विभागातील कर्मचाऱ्यांनाही ‘आश्वासित प्रगती’ योजनेचा लाभ मिळणार आहे.

-------------

Web Title: Benefit of ‘Assured Progress’ to ‘Women and Child Development’ staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.