योजनांमार्फत दोन कोटी रूपयांचा लाभ ठाणे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या थेट बॅक खात्यात !
By सुरेश लोखंडे | Published: February 3, 2024 04:39 PM2024-02-03T16:39:20+5:302024-02-03T16:40:47+5:30
लाभाची रक्कम थेट या कामगारांच्या बॅंक खात्यात डीबीटीव्दारे जमा करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकउून स्पष्ट करण्यात येत आहे.
सुरेश लोखंडे, ठाणे : राज्य शासनाने सुरु केलेल्या “शासन आपल्या दारी” या अभियानातंर्गत ठाणे जिल्ह्यात जानेवारी अखेर पात्र एक हजार ३१० बांधकाम कामगारांना विविध याेजनांच्या माध्यमातून एक काेटी ९८ लाख १३ हजार ३४२ रूपयांचा लाभ झाला आहे. या लाभाची रक्कम थेट या कामगारांच्या बॅंक खात्यात डीबीटीव्दारे जमा करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकउून स्पष्ट करण्यात येत आहे.
लाभार्थ्याच्या बॅंक खाात्यात जमा झालेल्या या रकमेसह या बांधकाम कामगारांना बांधकाम मंडळामार्फत सात हजार ३९५ अत्यावश्यक संच व सात हजार ३९५ सुरक्षा संच वाटप ही करण्यात आले आहेत. तर चार हजार ६४३ कामगारांची विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आल्याची नाेंद करण्यात आलेली आहे. याशिवाय आयोजित केलेल्या “नमो कामगार कल्याण” या अभियानातंर्गत बांधकाम कामगार मंडळामार्फत पात्र एक हजार ५८९ कामगारांना अत्यावश्यक संच व एक हजार ५८९ कामगारांना सुरक्षा संच वाटप करण्यात झाले आहे, असे ठाणे कामगार उपायुक्त प्र.ना.पवार यांनी सांगितले.
कामगार विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यरत असून या मंडळात बांधकाम व बांधकामाशी निगडीत व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी केली जात आहे. नोंदणी करण्याकरिता मंडळाने संकेतस्थळ (वेबसाईट www.mahabocw.in) विकसित केले असून या संकेतस्थळाद्वारे कामगार आपली नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करु शकत आहेत.