स्थानिक परिवहन सेवेला बेस्ट, टीएमटीचा टेकू
By admin | Published: October 16, 2015 01:46 AM2015-10-16T01:46:37+5:302015-10-16T01:46:37+5:30
पालिकेने खाजगी व लोकसहभाग तत्त्वावर सुरू केलेली स्थानिक परिवहन सेवा तोकडी पडू लागल्याने त्याला पर्याय म्हणून
राजू काळे, भार्इंदर
पालिकेने खाजगी व लोकसहभाग तत्त्वावर सुरू केलेली स्थानिक परिवहन सेवा तोकडी पडू लागल्याने त्याला पर्याय म्हणून नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत एसटी, बेस्ट व टीएमटी सेवेचा टेकू घेण्याचे ठरवून त्या-त्या प्रशासनाला साकडे घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
विविध कारणांमुळे पालिका परिवहन सेवेतील आजमितीस केवळ १५ ते १८ बसच रस्त्यावर धावत असून त्यात उत्तनसाठी २, चौककरिता ४, एस्सेल वर्ल्डसाठी १ अशा एकूण ७ बस या महत्त्वाच्या मार्गांवर सुरू ठेवण्यात आल्या आहेत. या तोकड्या सेवेमुळे प्रवाशांना जादा पैसे मोजून पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. पालिकेने उर्वरित २०० पैकी १०० बस खरेदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविल्यानंतर केंद्राने दिलेल्या मंजुरीनुसार खरेदी केलेल्या बस पुढील वर्षी सेवेत दाखल होणार आहेत. यादरम्यान तोकड्या पडलेल्या स्थानिक परिवहन सेवेवर चर्चा करण्यासाठी आयुक्त अच्युत हांगे यांनी नुकतीच आढावा बैठक आयोजिली होती. महापौर गीता जैन, उपमहापौर प्रवीण पाटील, स्थायी सभापती, सभागृह नेता रोहिदास पाटील, सर्वपक्षीय गटनेते यांनी नवीन बससेवेत दाखल होईपर्यंत एसटी, बेस्ट व टीएमटी परिवहन सेवेचा आधार घेण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. त्यानुसार, प्रशासनाने पर्यायी सेवांचा शोध घेण्यास सुरुवात केल्याचे परिवहन विभाग
प्रमुख कल्पिता पिंपळे-वडे यांनी सांगितले.