ठाणेकरांनी अनुभवली विविध काव्यविषयांनी नटलेल्या कवितांची दर्जेदार काव्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 04:55 PM2019-06-06T16:55:32+5:302019-06-06T16:58:23+5:30
झलक या कार्यक्रमात विविध विषयांवरच्या कवितांची काव्ययात्रा रंगली होती.
ठाणे: विविध काव्यविषयांनी नटलेली विभिन्न शैली व धाटणीच्या ताल कवितांची दर्जेदार काव्ययात्रा ठाण्यात रंगली. अजेय संस्था आयोजित झलक या कार्यक्रमात निवडक कवितांचा कार्यक्रम संपन्न झाला. मराठी ग्रंथ संग्रहालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सुप्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर म्हणाले, कलेचे वेड हे नशेसारख असते. ते अंगात शिरले की आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर आपल्याला हव्या त्या गोष्टी आपल्यापर्यंत येऊन पोचतात. नेहमीच्या प्रसन्न ओघवत्या व खुमासदार शैलीत मार्गदर्शन करुन त्यांनी कार्यक्र मावर कळस चढवला.
अजेय संस्थेचे डॉ. क्षितीज कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन कार्यक्रमास सुरूवात केली. त्यांनी व्हॉट्सअपवर कविता पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यातून आलेल्या कवितांमधून निवड प्रक्रि येनंतर निवडलेल्या कविता या त्या कवींकडून रसिकांना ऐकायला मिळाल्या. या निवड प्रक्रियेचे परिक्षक असलेले कवी विकास भावे यांनी संसाराचे गणित ही कविता सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली. अस्मिता चौधरी यांनी ‘माझी मायमराठी’, श्रद्धा साळी यांनी ‘मनाच्या मनात’, शिल्पा शेडगे यांनी ‘मनाशी हितगूज’, भारती मेहता यांनी ‘भूक भूक’, मनमोहन रोगे यांनी ‘महाराष्ट्र देश’, रेश्मा मेहता यांनी ‘रंगहीन मेंदी’, मानसी चापेकर यांनी ‘बाईपण’, प्रतिभा चांदुरकर यांनी ‘चांदणं’, मानसी जोशी यांनी ‘निसर्गभाषा करा आपुली’, श्रीनिवास गोखले यांनी ‘तुझं माझं हितगुज’ या कविता सादर केल्या. यावेळी झपुर्झा पुरस्कार २०१९ जाहीर करण्यात आले. ते खालीलप्रमाणे आहेत. शिवानी गोखले हिला फेस आॅफ दि इअर, सर्वोत्तम पदार्पण पुरस्कार : अभिनय : सुनीता फडके, साहित्य : स्वाती भट, तालीम सर्जक पुरस्कार : पवन वेलकर, अभिनव सावंत, झपुर्झा मैत्र पुरस्कार २०१९ : मनीषा चव्हाण, कार्तिक हजारे, नाट्य मित्र पदवी : अवधूत यरगोळे, नृत्य मयूर पुरस्कार : महेश गोळसे, कार्तिक हजारे यांना तर विशेष गुणवत्ता प्रमाणपत्रे वर्षा ओगले (कलादिग्दर्शक), श्रीरंग खटावकर (शब्दसेल्फी), यश सलागरे (शब्दसेल्फी), स्वाती भट (शब्दसेल्फी), सायली शिंपी (मी तर प्रेम दिवाणी काव्यचित्रपट दिग्दर्शन), नम्रता तावडे (काव्यचित्रपट), विकास भावे (खेड्यामधले घर कौलारू), कार्तिक हजारे (खेड्यामधले घर कौलारू), पवन वेलकर.(इंद्रायणी काठी), महेश गोळसे (हुब), अश्विनी गोडसे (हुब), अवधूत यरगोळे.(हुब), हेमांगी कुळकर्णी. (फिरु नी नवी जन्मेन मी), पवन वेलकर (दहा), सुनीता फडके (दहा), सायली शिंपी (दहा), शिवानी गोखले (दहा), अभिनव सावंत (दहा), कार्तिक हजारे (दी तिकीट), गौरव संभुस (नियोजन), स्वाती भट (वार्षिक अंक), अवधूत यरगोळे व टीम (वार्षिक अंक), स्नेहा शेडगे (लेखन : भूमिका शॉर्ट फिल्म.), नम्रता तावडे ( शॉर्ट फिल्म : भूमिका) आणि हॉल आॅफ फेम सन्मान : मानसी जोशी यांना जाहीर करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अधूनमधून ‘झपुर्झा - पडद्यावरचे नाटक’चे आणि दहा या रंगभूमीवरच्या पहिल्या पटकथानाट्याचे दृश्य यावेळी दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन कार्तिक हजारे यांनी केले.