वंशाच्या दिव्यापुढे ‘बेटी बचाव’; मुलींचा जन्मदर वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:46 AM2021-09-23T04:46:16+5:302021-09-23T04:46:16+5:30

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जिल्ह्यात बेटी बचाव, बेटी पढाव यासारख्या मोहिमा राबवल्या जात ...

‘Beti Bachao’ before the lamp of descent; Birth rate of girls increased! | वंशाच्या दिव्यापुढे ‘बेटी बचाव’; मुलींचा जन्मदर वाढला!

वंशाच्या दिव्यापुढे ‘बेटी बचाव’; मुलींचा जन्मदर वाढला!

googlenewsNext

सुरेश लोखंडे

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जिल्ह्यात बेटी बचाव, बेटी पढाव यासारख्या मोहिमा राबवल्या जात आहेत. यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्मदराचे प्रमाण ९६४ करण्यात यश आले आहे. गेल्या चार वर्षांपासून मुलींचा जन्मदर वाढवणे यंत्रणेला शक्य होत आहे.

जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१७-१८ ला एक हजार मुलांच्या जन्माच्या तुलनेत ९४९ मुलींच्या जन्माचे प्रमाण होते. पण या वर्षात त्यात वाढ होऊन मुलींच्या जन्माचे प्रमाण ९६४ झाल्याची खुशखबर प्रशासनाकडून ऐकवली जात आहे. मुलींच्या जन्माच्या या प्रमाणवाढीत गेल्या चार वर्षांत तुलनात्मकदृष्ट्या समाधानकारक वाढ झाल्याचे अहवालावरून उघडकीस आले आहे.

-----------------------

३) लिंगनिदानास बंदी : जिल्ह्यातील गावपाड्यांतील रहिवाशांमध्ये जनजागृती करुन मुलीच्या जन्माला प्रोत्साहन दिले जात आहे. मुलींविषयीचे गैरसमज दूर करण्यात आरोग्य विभागास यश मिळत आहे. मुलगा आणि मुलगी एकच असल्याची मानसिकता तयार करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, दवाखाने आरोग्य केंद्र आणि सीटी स्कॅन सेंटरमध्ये लिंगनिदान कायमचे बंद करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात समाधानकारक वाढ करणे शक्य झाले आहे.

----------

जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचे अधिकारी, कर्मचारी आरोग्य सेवकांकडून गावपाड्यांत जनजागृती करुन कुपोषित बाळ जन्माला येणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी विविध मोहिमा हाती घेतल्या आहेत. समाजातील गैरसमज दूर केले जात आहेत. कोठेही गर्भलिंगनिदान होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.

- डाॅ. मनीष रेंघे

जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प., ठाणे

---------------------------------

* एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण

* २०१७-१८- ९४९

* २०१८-१९- ९६०

* २०१९-२०- ९६२

* २०२०-२१- ९६४

------------

* या वर्षांत जन्मलेली मुले व मुलींची संख्या

वर्षे- मुले - मुली

* २०१७-१८- ७०,२१०- ६६,६४३

* २०१८-१९- ६९,१२१- ६६,३३४

* २०१९-२०- ७६,८४३- ७३,९०९

* २०२०-२१- ७६,९२५- ७४,१२१

--------------

Web Title: ‘Beti Bachao’ before the lamp of descent; Birth rate of girls increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.