उल्हासनगरात बोगस डॉक्टरांची खैर नाही, बोगस डॉक्टरांसाठी महापालिकेची समिती

By सदानंद नाईक | Published: December 15, 2023 07:30 PM2023-12-15T19:30:10+5:302023-12-15T19:30:26+5:30

कोरोनानंतर महापालिका आरोग्य विभागाचे बोगस डॉक्टरांवर दुर्लक्ष झाले आहे.

beware Bogus doctors in Ulhasnagar, municipal committee for bogus doctors | उल्हासनगरात बोगस डॉक्टरांची खैर नाही, बोगस डॉक्टरांसाठी महापालिकेची समिती

उल्हासनगरात बोगस डॉक्टरांची खैर नाही, बोगस डॉक्टरांसाठी महापालिकेची समिती

सदानंद नाईक
उल्हासनगर :
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शहरातील बोगस डॉक्टरांवरील कारवाईसाठी एका समितीची स्थापना केली. आयुक्तांच्या निर्णयाने बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले असून कारवाई पूर्वीच झोपडपट्टी परिसरातील अनेक डॉक्टर गायब झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

 उल्हासनगरातील झोपडपट्टी भागात बोगस डॉक्टरांनी आपले जाळे पसरविले आहे. अश्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. अखेर आयुक्त अजीज शेख यांनी अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन एका कमिटीची स्थापना केली. उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड व इतर राज्यातुन बोगस सर्टिफिकेट मिळवून शहरातील झोपडपट्टी भागात बोगस डॉक्टरांनी दवाखाने थाटले असून यापूर्वी बोगस डॉक्टरांवर महापालिकेने कारवाई केली होती.

मात्र कोरोनानंतर महापालिका आरोग्य विभागाचे बोगस डॉक्टरांवर दुर्लक्ष झाले आहे. स्थापन केलेल्या समितीची बैठक गुरवारी स्थायी समिती सभागृहात आयुक्त अजीज शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. समिती ही नागरी आरोग्य केंद्र निहाय बोगस डॉक्टरांचे सर्वेक्षण करुन, त्यांच्यावर कारवाई करणार आहे.  

Web Title: beware Bogus doctors in Ulhasnagar, municipal committee for bogus doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.