सावधान! येऊरच्या जंगलात पाच बिंबट्यांचा मुक्त संचार; १५२ पशूपक्षी, वन्यप्राण्यांचा वावर!

By सुरेश लोखंडे | Published: May 24, 2024 10:18 PM2024-05-24T22:18:45+5:302024-05-24T22:18:57+5:30

येऊर प्रमाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तनसा अभयारण्य, माळशेज घाट परिसरात रात्री वन्यजीव, पशुपक्षी, प्राणी गणना करण्यात आली आहे.

Beware! Free movement of five birds in Yeur forest; 152 Birds, wild animals! | सावधान! येऊरच्या जंगलात पाच बिंबट्यांचा मुक्त संचार; १५२ पशूपक्षी, वन्यप्राण्यांचा वावर!

सावधान! येऊरच्या जंगलात पाच बिंबट्यांचा मुक्त संचार; १५२ पशूपक्षी, वन्यप्राण्यांचा वावर!

ठाणे : या स्मार्ट सिटीच्या शहराला लागून असलेल्या संजय गांधीं राष्ट्रीय उद्यान, येऊरच्या जंगलातील १२ पाणवठे, डोह, झर्यांच्या ठिकाणी  रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी येणार्या वन्यजीव पाण्यांची गणना ४२ वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून केलली. त्यात तब्बल पाच बिबट्यांचा या जंगलात मुक्त संचार आढळून आला असून हरीण,सांबर,माकड, ससा, रान डुक्कर, साळींद, मांजरी आदी १५२ वन्यजीव, प्राण्यांचा वावर अल्याची नोंद वनाधिकारी, कर्मचारी, वन्यजीव प्रेमींनी मचाण सर्वेक्षणाद्वारे केली आहे.
 
शहराजवळील येऊरचे जंगल हे निसर्गाचे वरदान ठाणेकरांना लाभले आहे. विविध रंगीबेरंगी पाना फुलांची वनसंपदा, औषधी वनस्पती, वेली आदींनी नटलेल्या या येऊरच्या जंगलात मनसोक्त वावरणारे, वन्यजीव प्राणी,पशूपक्षी जंगलातील पाणवठ्यांवर रोज रात्री पाणी पिण्यासाठी येतात. दिवसभराच्या  कडकडीत उन्हामुळे तहानेने व्याकूळ झालेले पशूपक्षी, वन्यजीव प्राणी रात्रीच्या अंधाराचा सहारा घेऊन पाणी पिण्यासाठी पाणवठ्यांवर येतात. आजच्या बुद्धंपौर्णिमेच्या चांण्यामध्ये ते रात्री स्पष्ट दिसतात. त्यांमुळे वनविभागाकडून गुरवारी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री वन्यजीव, पशुपक्षी गणना करण्यात आली आहे. येऊर प्रमाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तनसा अभयारण्य, माळशेज घाट परिसरात रात्री वन्यजीव, पशुपक्षी, प्राणी गणना करण्यात आली आहे.

येऊरच्या जंगलातील ठिकठिकाणच्या पाणवठ्याच्या काही अंतरावरील  झाडांवर मचाण बांधून त्याव ४२ वनाधिकारी, वनपाल, वनरक्षक तैनात करून त्यांच्या कडून दुर्बिणीच्या सहाय्याने पाणी पिण्यासाठी आलेल्या प्राण्यांची, पशूपक्षांची नोंद रात्रभर करण्यात आली,असे येऊरचे वनाधिकारी संजय सोनटक्के यांनी लोकमतला सांगितले. 
----------

या पाणवठ्यांजवळ मचाण उभारून झाली वन्यजीव,प्राणी गणना- 

 घोडबंदरजवळील करंदीचे पाणी, येथील मचाणावर , वनरक्षक प्रितमकुमार वडजकर यांचे पथक,  याच परिसरातील काशीजवळील वळकुंडीचे पाणी येथे लपणकुटी उभारून त्यातून गणना करण्यात आली. चेणा पूर्व भागात टाकाचा नाला, चेणा पश्चिमेला आंब्याचे पाणी, ओवळा परिसरात कुंडाचा नाला, येऊर पश्चिमेला हुमायुन बंधारा, येऊर पुर्वेला चिखलाचे पाणी, कावेसर महेंद्राचे पाणी,  पाचपाखाडीजांभळीचे पाणी, नागला भागातील, करवेलचे पाणी सारजामोरी येथील तलवळीचे पाणी

----------------

येऊर परिक्षेत्राकडील गुरुवारी रात्री  पाणवठ्यावरील वन्यप्राणी गणना केली असता या पशूपक्षी, वन्यजीव प्राण्यांंची नोंद झाली 


वन्यप्राणी  - संख्या 

विवटया - ५
सांबर - १५ 

रान-डुक्कर - ६

लंगूर - २२


रान-कोंबडा - ५

लालतोंडी- १५

ससा- ९ 


वट-वाघुळ- २१

घुवड- ६


मुगुंस - ३


माकड -४०


साळींदर-३


धामण - १


रानमांजर - २

Web Title: Beware! Free movement of five birds in Yeur forest; 152 Birds, wild animals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे