लॉटरी लागल्याचे ई-मेल किंवा मेसेज आल्यास सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:46 AM2021-08-18T04:46:41+5:302021-08-18T04:46:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ऑनलाईन फसवणुकीच्या घटना कोरोना कालावधीत वाढल्या आहेत. तुम्हाला अमुक रकमेची लॉटरी लागली आहे, तुम्हाला ...

Beware of lottery e-mails or messages! | लॉटरी लागल्याचे ई-मेल किंवा मेसेज आल्यास सावधान!

लॉटरी लागल्याचे ई-मेल किंवा मेसेज आल्यास सावधान!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : ऑनलाईन फसवणुकीच्या घटना कोरोना कालावधीत वाढल्या आहेत. तुम्हाला अमुक रकमेची लॉटरी लागली आहे, तुम्हाला गिफ्ट लागले आहे, ते मिळविण्यासाठी तुम्हाला अमुक रक्कम भरावी लागेल. त्यासाठी तुमचा तपशील पाठवा असे फेक मेसेज आणि ई-मेल सर्रास पाठविले जात असून यात बक्षिसाची रक्कम पाहून भुरळ पडलेली व्यक्ती अलगद हॅकर्सच्या जाळ्यात अडकते आणि आपले आर्थिक नुकसान करून घेते. ऑनलाईन चोरांपासून सावधान राहण्यासाठी अशाप्रकारच्या मेसेजकडे दुर्लक्ष करा, त्यावर विश्वास ठेवू नका, कोणतीही लिंक ओपन करू नका, तसेच समोरून येणाऱ्या कॉलला प्रतिसाद देऊ नका असे आवाहन वारंवार पोलिस विभागाकडून केले जाते. परंतु तरीही या घटना सातत्याने घडत आहेत आणि पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होत आहेत हे वास्तव आहे.

-------------------------------------

फिशिंग ई-मेल

सायबर क्राईम करणारे लोकप्रिय वेबसाईटप्रमाणे दिसणाऱ्या फिशिंग वेबसाइट बनवतात. फिशिंग हे सामाजिक अभियांत्रिकी तंत्राचे उदाहरण आहे. याचा वापर फसवणुकीसाठी केला जातो. सोशल नेटवर्क, लिलाव साईड, बँका, ऑनलाईन पेमेंट प्रोसेस या माध्यमातून हॅकर्सकडून फिशिंग मेलद्वारे आमिष दाखविले जाते. भाला फिशिंग, व्हेलिंग आणि क्लोन फिशिंग, फिल्टर चोरी हे प्रकार आहेत. यातून दिवसागणिक एक मेसेज, ई-मेल अथवा कॉलचा वापर करून तुम्हाला भुलविण्यासाठी आकर्षक ऑफर्स दिल्या जातात. यात लॉटरी, कार, पैसे, दुचाकी अशा लोभाच्या गोष्टींचे आकर्षण दाखविले जाते. करोडपती होण्याचा सोपा मार्ग अशा प्रकारच्या टॅगलाइन वापरल्या जातात. दरम्यान, संबंधित हॅकर्सकडून तुमचे मोबाईल नंबर, तुमचे मेल आयडी शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जातो. या माध्यमातून आपला पासवर्ड, पिन चोरीसह एटीएम कार्डवरील सीव्हीव्ही नंबर वापरून आर्थिक फसवणूक केली जाते. यात बहुतांश वेळा ज्येष्ठ नागरिकांसह महिला आणि तरुण याला बळी पडतात. नागरिकांना १० हजारांपासून लाखोंचा गंडा घातला गेला आहे.

-------------------------------

ही घ्या काळजी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार बँकिंग कामांसाठी बँकेच्या अखत्यारीत ही कामे केली जावीत. फोन किंवा इतर पर्यायी साधनांचा वापर करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट केले आहे. बँकिंग संबंधित ॲप वापरताना, तसेच इंटरनेट बँकिंगचा वापर करताना पब्लिक वायफायचा वापर करू नये किंवा तुमच्या फोनचा पासवर्ड, एटीएम पासवर्ड दुसऱ्यांना देऊ नये किंवा सतत बदलत राहणे आवश्यक आहे. पण नागरिक या निर्देशांकडे कायमच दुर्लक्ष करीत आहेत, असे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ग्राहकाच्या बँक खात्यातून मेसेजद्वारे केवायसी डिटेल्सचा वापर करीत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मेसेज हेडर किंवा सेंडर आयडीसह कॅरेक्टर्स आहेत, ज्यात कंपनींच्या नावाचा वापर केला जातो. संबंधित कंपन्यांनीदेखील या मेसेजपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे.

-------------------------------

वेबसाईटची सुरुवात एचटीटीपीएसपासून झाली आहे का?

हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल (एचटीटीपी) हा प्रोटोकॉल हायपरमीडिया माहिती प्रणालीसाठी अनुकूल आहे. या माध्यमाद्वारे वापरली जाणारी वेबसाईट अधिकृत मानली जाते. असे असल्यावरच ती वेबसाईट ओपन करून पाहावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

-------------------------------

लाखोंचा घातला गंडा

केस 1

भारतीय सैन्य दलात असल्याची बतावणी करीत एकूण आठ लाख ३४ हजार ४९९ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याच्या दोन घटना जुलै महिन्यात घडल्या आहेत. यात गुगल पेवर संपर्क साधत पैसे उकळण्यात आले आहेत. यात तब्बल २० हून अधिक आरोपी आहेत. सैन्य दलात असल्याचे सांगून मुलाला प्रवेश घेण्यासाठी पैसे हवे असल्याची बतावणी करण्यात आली. यात काही नागरिकांची फसवणूक झाली असून याप्रकरणी मानपाडा आणि रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

----------------

केस 2

कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा प्रणव याची मायक्रोनेट एंटरप्राइजेस नावाची फर्म असून त्यामध्ये कामाला असलेल्या आशिषकुमार चौधरी याने शिक्षणाकरिता ईआरपी सॉफ्टवेअर डेव्हलप करून त्याद्वारे फर्मला अधिक फायदा करून देण्याचे आश्वासन दिले होते. डॉ. डी. वाय. पाटील संस्था आणि जळगाव विद्यापीठ यांना सॉफ्टवेअर विकत असल्याबाबत बनावट ई-मेल करून जळगाव विद्यापीठाबरोबर बनावट ॲग्रीमेंट करून ते प्रणवच्या फर्मकडे सादर केले होते. दरम्यान, ईआरपी सॉफ्टवेअर तयार करण्याच्या उद्देशाने फर्मच्या बँक खात्यावरून ३९ लाख २० हजार रुपयांची रक्कम २०१८ ते २०२० या कालावधीत टप्प्याटप्प्याने आशिषकुमारने आरटीजीएसद्वारे स्वत:च्या बँक खात्यात हस्तांतरित करीत फसवणूक केली होती. आशिषकुमारला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

------------------

Web Title: Beware of lottery e-mails or messages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.