बेकायदा बांधकामांकडे डोळेझाक करणाऱ्यांना बडतर्फ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:42 AM2021-05-07T04:42:48+5:302021-05-07T04:42:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरात दिवसेंदिवस उभ्या राहणाऱ्या बेकायदा बांधकामांविरोधात मी आवाज उठवित आहे. काही दक्ष नागरिकांनीही वारंवार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरात दिवसेंदिवस उभ्या राहणाऱ्या बेकायदा बांधकामांविरोधात मी आवाज उठवित आहे. काही दक्ष नागरिकांनीही वारंवार पुराव्यानिशी तक्रार करूनही अशा बांधकामांवर कोणतीच कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या बेकायदा बांधकामांकडे डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी ठाणे काँग्रेसचे नेते संजय घाडीगावकर यांनी केली आहे.
शहरात बेकायदा बांधकामे वाढत असताना उच्च न्यायालयात उपायुक्त अशोक बुरफुले यांनी दिलेले शपथपत्र म्हणजे उच्च न्यायालयाची दिशाभूल व फसवणूक करणारे आहे. पुराव्यानिशी तक्रारी येऊनही कारवाई न करणारे ठाणे मनपा आयुक्त धृतराष्ट्राच्या भूमिकेत वा राजकीय दबावाखाली आहेत का, असा सवाल घाडीगावकर यांनी केला आहे. बेकायदा बांधकामांबाबत पुरावे देऊनही संबंधित उपआयुक्त, सहायक आयुक्त कोणावरही कारवाई करीत नाहीत, हे दुर्दैव आहे. भ्रष्ट अधिकारी ठाणे शहराचा चेहरा विद्रूप करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
----------------