कट्टा क्रमांक ४१० वर 'Beyond The boundary' : भारत पाक सीमेवरील वास्तवाचे दर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 04:27 PM2019-01-07T16:27:29+5:302019-01-07T16:28:50+5:30

अभिनय कट्ट्यावर ठाणेकरांना भारत पाक सीमेवरील वास्तवाचे दर्शन घडले. 

'Beyond the boundary' on Katta No. 410: Vision of reality on the Indo-Pak border | कट्टा क्रमांक ४१० वर 'Beyond The boundary' : भारत पाक सीमेवरील वास्तवाचे दर्शन 

कट्टा क्रमांक ४१० वर 'Beyond The boundary' : भारत पाक सीमेवरील वास्तवाचे दर्शन 

Next
ठळक मुद्देठाणेकरांना घडले भारत पाक सीमेवरील वास्तवाचे दर्शन अभिनय कट्ट्यावर 'Beyond The boundary'किरण नाकती यांनी साधला कलाकार आणि प्रेक्षकांशी संवाद

ठाणे : भारत पाक संघर्षामुळे काश्मिरी रहिवाशांच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेला संघर्ष , भारतीय सैनिकांचे जीवन आणि धार्मिक संघर्षातून निर्माण झालेला मानवी जीवनातील भाव भावनांचा संघर्ष ह्याचं धगधगत सादरीकरण म्हणजे 'Beyond The Boundary'. अभिनय कट्ट्यावर ठाणेकरांना भारत पाक सीमेवरील वास्तवाचे दर्शन घडले. 

वर्षोनुवर्षे जम्मू काश्मीर मधील तणावग्रस्त परिस्थितीत राहून काश्मिरी लोकांचे आयुष्य हलाखीचे झाले आहे .काही मजबुरीने ,काही धर्माच्या नावाखाली काही परिस्तिथीमुळे अतिरेकी संघटनेत सामील होत आहेत.अशातच भारतीय सैनिक आणि काश्मिरी नागरिक ह्यांच्यात काहीवेळा गैरसमजातून संघर्षपूर्ण स्थिती निर्माण होण्याचा अनुभव आहे. Beyond the Boundary म्हणजे त्याचाच नाट्यमय अनुभवच. लेखक दिग्दर्शक राजन मयेकर ह्यांनी सारे वास्तव नाट्यमय रित्या सुंदर रित्या उभे केले आहे. एक भारतीय सैनिक दीपक अंधारात जीव वाचवण्याच्या आकांताने धावत पळत सीमेजवळील एक घरात आश्रयासाठी घुसतो. त्यावेळेस त्या घरात शमा नावाची मुलगी  आणि तिची आईच असते. शमाची आई दीपकला परतून जाण्यास सांगते परंतु शमाला त्याची दया येऊन ती त्याला थांबवण्यास आईला विनावते.त्या दरम्यान सदर घर हे एक अतिरेक्याचे आहे ही गोष्ट दीपकला समजते.शमाच्या आईच्या डोक्यात धर्माबद्दलचे चुकीच्या समजुतीमुळे ती अतिरेक्यांच्या टोळीला दिपकची खबर देते.त्याच दरम्यान संघर्षपूर्ण जगण्याला कंटाळलेली शमा आणि दीपक यांच्यातील मने जुळून येतात म्हणून ह्या सर्वांपासून मला दूर घेऊन चल अशी विनवणी ती दीपकला करते.परंतु तोपर्यंत अतिरेकी दीपकला गाठतात.अतिरेकी आणि दीपक ह्यांच्यात संघर्ष होतो त्यादरम्यान सूड भावनेने शमाची आई दीपकवर गोळी चालवते पण त्यात शमा मृत्युमुखी पडते. धर्माबद्दलचची चुकीची समजूत आणि सीमाभागातील संघर्ष ह्यात शमा सारख्या अनेकांचा बळी जात आहे ह्याच चित्रीकरण म्हणजे 'Beyond The Boundary '. सदर एकांकिकेत कुंदन भोसले, रोहिणी थोरात, साक्षी महाडिक,सहदेव साळकर, ओमकार मराठे,शुभम कदम आणि अभिषेक निगम यांनी काम केले. एकांकिकेचे संगीत सहदेव कोलंबकर आणि प्रकाशयोजना धनेश चव्हाण ह्यांनी केले. सदर एकांकिकेसाठी काश्मीर मधील घराचे नेपथ्य सहदेव साळकर ओमकार मराठे आणि शुभम कदम ह्यांनी उभे केले. कट्टा क्र ४१० चे निवेदन कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी केले. कट्ट्याची सुरुवात  माजी महापौर प्रेमसिंग रजपूत, रामदास खरे व रुक्मिणी कदम ह्यांनी दीपप्रज्वलन करून केली.एकांकिकेनंतर अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती यांनी कलाकार आणि प्रेक्षकांशी संवाद साधला.

Web Title: 'Beyond the boundary' on Katta No. 410: Vision of reality on the Indo-Pak border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.