झेंडावंदनाचा ‘भादाणे पॅटर्न’, विद्यार्थ्यांना दिला जातो मान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 11:16 PM2020-01-21T23:16:18+5:302020-01-21T23:17:08+5:30

जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा मान अनुक्र मे गावातून दहावी व बारावी परीक्षेत प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय

The 'Bhadaane Pattern' for Flagging | झेंडावंदनाचा ‘भादाणे पॅटर्न’, विद्यार्थ्यांना दिला जातो मान

झेंडावंदनाचा ‘भादाणे पॅटर्न’, विद्यार्थ्यांना दिला जातो मान

googlenewsNext

मुरबाड : जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा मान अनुक्र मे गावातून दहावी व बारावी परीक्षेत प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय भादाणे गावचे माजी सरपंच संजय हांडोरे- पाटील यांच्या प्रयत्नातून घेण्यात आला होता. या अभिनव उपक्र माची येत्या २६ जानेवारीला दशकपूर्ती होत आहे. झेंडावंदनाचा भादाणे पॅटर्न राज्यात लागू करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व सामिजक संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे.

२०१५ मध्ये सुरू झालेली ही अनोखी संकल्पना आज गावातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाला चालना देणारी आणि त्यांच्या आईवडिलांना मान सन्मान देणारी ठरली आहे. त्याचबरोबर गावातील झेंडावंदन करण्यावरून होणारे वाद, हेवेदावे तसेच प्रत्येक गावातील श्रेयवादाची परंपरा, रूसवे फुगवे या सर्व वाईट प्रथांना चपराक देणारी ठरली आहे. प्रत्यक्ष झेंडावंदन सुरू असताना तसेच एक महिना अगोदर गावात वादाचे राजकारण सुरू असते त्याचा बालमनावर परिणाम होत असे. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण होण्याºया विद्यार्थ्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आतापर्यंतचे मानकरी

विशाल शेलवले
(१५ आॅगस्ट २०१५, दहावी)
अमित यशवंतराव
(२६ जानेवारी २०१६, बारावी)
स्वराज शेलवले
(१५ आॅगस्ट २०१५६, दहावी)
विद्या शेलवले
(२६ जानेवारी २०१७, बारावी)
भावेश शेलवले
(१५ आॅगस्ट २०१७, दहावी)
भावना सोनावळे
(२६ जानेवारी, २०१८ बारावी)
भूषण शेलवले
(१५ आॅगस्ट २०१८, दहावी)
स्वराज शेलवले
(२६ जानेवारी २०१९, बारावी)
अक्षदा यशवंतराव
(१५ आॅगस्ट, २०१९ दहावी)
 

Web Title: The 'Bhadaane Pattern' for Flagging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.