तानशेत, उंबरमाळी रेल्वेस्थानकांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 05:51 AM2018-11-13T05:51:03+5:302018-11-13T05:51:23+5:30

सहा हजार प्रवाशांचा त्रास दूर होणार : गुरवली, सावरोली स्थानकांच्या मागणीचाही पाठपुरावा

Bhaibipujan of Tanshet, Umrahmali railway station | तानशेत, उंबरमाळी रेल्वेस्थानकांचे भूमिपूजन

तानशेत, उंबरमाळी रेल्वेस्थानकांचे भूमिपूजन

Next

शहापूर : तानशेत आणि उंबरमाळी या दोन रेल्वेस्थानकांचा भूमिपूजन समारंभ रविवारी खा. कपिल पाटील आणि आ. पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते पार पडला. लवकरच या दोन स्थानकांचे बांधकाम होऊन ही स्थानके उभारली जाणार असल्याने सुमारे सहा हजार प्रवाशांचा त्रास दूर होणार आहे. काही वर्षांपासून शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थ उंबरमाळी तसेच तानशेत रेल्वेस्थानके अधिकृत करण्याची मागणी करत होते. या स्थानकांवर प्लॅटफॉर्मसह अन्य सुविधा नव्हत्या. काही वेळेस गाडी न थांबल्याने स्थानिकांचे हाल होत होते. त्यामुळे रेल्वेस्थानकांना अधिकृत मान्यता देण्याची मागणी होत होती.

कल्याण-कसारा-कर्जत म्हणजे के-३ आणि कल्याण- कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन या दोन रेल्वे संघटनांनी निवेदने देऊन भेटीगाठी घेऊन आंदोलन तसेच धरणे यामार्फत प्रयत्न सुरू ठेवले होते. वरिष्ठ पातळीवर मंजुरीसाठी प्रयत्न झाल्याने अखेर हा प्रश्न मार्गी लागला. हजारो प्रवाशांची दैना दूर झाल्याने त्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे, आदिवासी प्रकल्पस्तरीय अध्यक्ष अशोक इरणक, भाजपाचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव, भाजपाच्या रंजन उघडा, शिरोळचे सरपंच संतोष आरे, उपसरपंच सचिन निचिते, राष्ट्रवादीचे नेते मनीष निचिते, लाहेगावचे उपसरपंच अरु ण खंबाळकर आणि उंबरमाळी, तानशेत पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. यामुळे येथील प्रवाशांचे हाल वाचणार आहेत.

च्गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गुरवली, सावरोली या रेल्वेस्थानकांच्या मागणीचादेखील पाठपुरावा करणार असल्याचे खासदार पाटील यांनी स्पष्ट केले.
च्१९६५ पासून तत्कालीन खासदार सोनुभाऊ बसवंत यांनी केलेल्या पत्रव्यवहाराचा संदर्भ घेत आता
त्या स्थानकांचीही मागणी
लवकरच पूर्ण होईल, असे ते म्हणाले.
 

Web Title: Bhaibipujan of Tanshet, Umrahmali railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.