भाईंदरची देवसंदेश मच्छिमार बोट खोल समुद्रात बिघडल्याने बोटीसह 15 जण अडकले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 10:18 PM2020-08-04T22:18:52+5:302020-08-04T22:18:58+5:30

समुद्र खवळलेला असतानाच भर समुद्रात बोट बिघडल्याने त्यावरील 15 मच्छीमार आणि खलाशी अडकून पडले आहेत.

Bhainder's Devsandesh Fisherman's boat capsized in the deep sea, leaving 15 people stranded | भाईंदरची देवसंदेश मच्छिमार बोट खोल समुद्रात बिघडल्याने बोटीसह 15 जण अडकले 

भाईंदरची देवसंदेश मच्छिमार बोट खोल समुद्रात बिघडल्याने बोटीसह 15 जण अडकले 

Next

मीरारोड - गोराईची मच्छीमार बोट समुद्रात बुडून 2 जण बेपत्ता झाले असताना भाईंदरच्या पाली येथील देवसंदेश हि मच्छीमार बोट किनाऱ्या पासून 40 किमी लांब खोल समुद्रात बंद पडली आहे . बोटीचे इंजिन बिघडले असून बोटीवरील 15 जण समुद्रात अडकले आहेत. 

पाली येथील नाखवा नेस्टर मुनीस यांची देवसंदेश हि मच्छीमार बोट मासेमारीसाठी 1 ऑगस्ट रोजी गेली होती . समुद्रात आलेल्या वादळीवारे आणि पावसामुळे मासेमारी साठी गेलेल्या बोटी परत किनाऱ्याला परंतु लागल्या . देवसंदेश देखील परत किनाऱ्याच्या दिशेने निघाली होती . परंतु किनाऱ्या पासून समुद्रात 40 किमी लांब अंतरावर असताना आज मंगळवारी दुपारी बोटीचे इंजिन बंद पडले . नाखवा व खलाशी आदींनी प्रयत्न करून देखील बोट सुरु झाली नाही. 

समुद्र खवळलेला असतानाच भर समुद्रात बोट बिघडल्याने त्यावरील 15 मच्छीमार आणि खलाशी अडकून पडले आहेत . सदर बाब मच्छीमार नेते माल्कम कासुघर , जॉर्जी गोविंद यांना कळताच अडकलेल्या मच्छीमारांना बोटी सह सुखरूप किनारी आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत . त्यांनी नौदल , तटरक्षक दल व मत्स्यविभागास मदतीसाठी विनंती केली आहे. मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील यांनी देखील तटरक्षक दलास पत्र देऊन अडकलेल्या  मच्छीमाराना सुखरूप परत आणण्याची विनंती केली आहे . तटरक्षक दल व नौदलाने देखील बोटीत अडकलेल्या 15 जणांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत . 

Web Title: Bhainder's Devsandesh Fisherman's boat capsized in the deep sea, leaving 15 people stranded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.