लोकलमधील भजनी ग्रुपची एकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 05:53 AM2017-08-10T05:53:19+5:302017-08-10T05:53:19+5:30
लोकलमध्ये भजनी ग्रुपने एका प्रवाशाला मुंब्रा ते नाहुर स्थानकांदरम्यान मारहाण केली. त्यामुळे लोकलमध्ये भजनी ग्रुपची दादागिरी वाढल्याचे दिसू लागले आहे. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे.
ठाणे : लोकलमध्ये भजनी ग्रुपने एका प्रवाशाला मुंब्रा ते नाहुर स्थानकांदरम्यान मारहाण केली. त्यामुळे लोकलमध्ये भजनी ग्रुपची दादागिरी वाढल्याचे दिसू लागले आहे. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे.
डोंबिवलीवरून मंगळवारी सकाळी ७.२९ वा. सुटलेली लोकल ७.३८ वा. दिव्यात आली. त्यात विनायक सोनावणे हे सीएसटीकडील पहिल्या मालडब्यात चढले. त्या वेळी भजनी ग्रुप डब्यात भजन गाताना जागा अडवून बसले होते. याचदरम्यान, डब्यात चढलेले एक वयोवृद्ध कसेबसे उभे होते. त्यांना जागा देण्याची विनंती त्यांनी भजनी ग्रुपकडे केली. त्या वेळी ग्रुपमधील काही जणांनी आवाज चढवून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या ग्रुपने ही मारहाण मुंब्रा ते नाहूरदरम्यान केल्याचे सोनावणे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच ही मारहाण होताना, कोणीही पुढे आले नाही.
त्यांनी मंगळवारी संध्याकाळी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर अनोळखी चार ते पाच जणांविरोधात अदखलपात्र तक्रार नोंदवली आहे. तसेच त्यांनी याबाबत ठाणे स्टेशन प्रबंधकांकडेही लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे अशाप्रकारे जागा अडवून भजने म्हणत सहप्रवाशांना त्रास देणाºया ग्रूपवर रेल्वे पोलीस कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.