शिवसेनेकडून भक्ती शक्ती संवाद यात्रा ; हिंदुत्वाचा जागर महाराष्ट्र भर !
By अजित मांडके | Published: December 18, 2023 10:46 AM2023-12-18T10:46:44+5:302023-12-18T10:47:00+5:30
स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. आनंदजी दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर पाऊल टाकत अध्यात्मिक क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले जावे म्हणून शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेची निर्मिती केली.
अजित मांडके
ठाणे : स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. आनंदजी दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर पाऊल टाकत अध्यात्मिक क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले जावे म्हणून शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेची निर्मिती केली.
महाराष्ट्रातील नानाविध भक्ती पंथ , तीर्थक्षेत्र व अध्यात्मिक क्षेत्रातील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार व निरुपणकार, गावोगावी असणारे भजन मंडळ या सोबत शक्तीचा अर्थात हिंदुत्वासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या सकल शिव शंभो विचारांना समाजा पर्यंत नेणाऱ्या तमाम युवक, गोरक्षक व ज्येष्ठांशी संवाद साधण्यासाठी धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांच्या भक्ती शक्ती संवाद यात्रा माध्यमातून महाराष्ट्रभर ३६ जिल्ह्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने प्रवास करणार आहेत.
प्रत्येक दिवसाची सांगता हजारो लोकांच्या उपस्थितीत कीर्तनाने होणार आहे. यावेळी त्यांच्या समवेत विविध पंथांचे प्रचारक व संत वंशज देखील असणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व कोकण अशा पाच टप्प्यात ही संवाद यात्रा होईल. संवाद यात्रेसाठी शिवसेना सचिव संजय मोरे व माध्यम समन्व्यक दिनेश शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले असे भोसले यांनी संवाद साधताना नमूद केले.
अध्यात्मिक क्षेत्रासाठी असा उपक्रम प्रथमच महाराष्ट्रात होत असल्याने अध्यात्मिक क्षेत्रातून देखील मोठ्या प्रमाणात याचे स्वागत केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व साधू संतांविषयी असणारा उत्कट जिव्हाळा व श्रद्धा या माध्यमातून दिसून येते. संतांनी आपल्याकडे येण्यापेक्षा आपणच संतांजवळ गेले पाहिजे हा संदेश यातून त्यांनी समाजाला दिला आहे. राजसत्ता व धर्मसत्ता जेव्हा सोबत प्रवास करते तेव्हा निश्चित रामराज्य निर्माण होते. शिंदे यांच्या नेतृत्वातील रामराज्य महाराष्ट्र पाहत आहे.
- अक्षयमहाराज भोसले
प्रदेशाध्यक्ष , शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना