‘भाल, वसार गावाच्या जागेवरील आरक्षण चुकीचे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:48 AM2021-09-07T04:48:28+5:302021-09-07T04:48:28+5:30
कल्याण : भाल आणि वसार गावाच्या जागेवर एमएमआरडीएने डिफेन्सचे आरक्षण टाकले आहे. मात्र, ते आरक्षण चुकीच्या पद्धतीने टाकले आहे, ...
कल्याण : भाल आणि वसार गावाच्या जागेवर एमएमआरडीएने डिफेन्सचे आरक्षण टाकले आहे. मात्र, ते आरक्षण चुकीच्या पद्धतीने टाकले आहे, असा आरोप जमीन बचाव समितीने केला आहे.
जमीन बचाव समितीचे चैनू जाधव यांनी शेतकऱ्यांसह उल्हासनगरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले आहे. या गावचे शेतकरी ७० वर्षांपासून शेती करीत आहेत. त्याच ठिकाणी अचानक एमएमआरडीएने आरक्षण टाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करायचे, असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे. वसार गावात २०१७ मध्ये अशा प्रकारच्या जमिनीचा फेरफार करून अधिकाऱ्यांना त्यावर एरोड्रोमची नोंद केली होती. तसेच उरलेल्या सातबारांच्या बाबतीत होऊ नये, अशी भीती शेतकऱ्यांना सतावित आहे. बेकायदा नोंदीमुळे जमिनीचे व्यवसाय होत नसल्याने बिल्डर जागा विकत घेत नाही. त्यामुळे वडिलोपार्जित जागेचा मालक असलेला शेतकरी वेठीस धरला जात आहे.
-------------------------