भिवंंडीत विकासकाकडून ६० लाख मागीतल्याचा भाजप नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 09:46 PM2018-04-24T21:46:16+5:302018-04-24T21:46:16+5:30
भिवंडी : शहरातील कामतघर येथील शामदनी हाईटच्या जागेवर जाऊन बिल्डर विकासकुमार गणपतलाल राठी यांस वारंवार मारहाण व शिवीगाळी करून २० लाखाची खंडणी उकळणाऱ्या तीन जणांविरोधात ठाणे खंडणी पथकाचे पोलीस निरिक्षक प्रदिप शर्मा यांच्या आदेशानुसार भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या तीघांमध्ये भाजपाचे प्रभाग समितीचे सभापती व गट नेत्याचा समावेश आहे.पोलीसांच्या या धाडसी कारवाईमुळे शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खबळ माजली आहे.आरोपींना अटक करू नये म्हणून पोलीसांवर दबाव तंत्र सुरू झाले आहे.
शहरातील कामतघर परिसरांत मोठमोठे विकासकामे सुरू असुन आहेत.त्यापैकी शहरातील कासारआळी गोकुळनगर येथे रहाणारे बिल्डर विकासकुमार राठी यांनी कामतघर परिसरांत शामदनी हाईट या इमारतींचे सुरू केले आहे. ही कामे सुरू ठेवण्यासाठी महानगरपालिकेतील कामतघर भागातील स्थानिक नगरसेवक तथा भाजपा गटनेता निलेश हरिश्चंद्र चौधरी,प्रभाग समिती क्र.३ चे सभापती हनुमान चौधरी तसेच माजी नगरसेवकाचा भाऊ महेश पाटील यांनी राठी यांच्याकडून ६० लाख रूपयांची मागणी केली होती.त्यापैकी सन २०१२-१३ सालापासून त्यांनी जुलूमाने २० लाख रूपये घेतले आणि उरलेल्या रक्कमेची मागणी करीत त्यांनी वेळोवेळी शिवीगाळी करून मारहाण केली. तसेच इमारत बांधकाम व्यवसाय बंद पाडण्याची तसेच कुटूंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली,अशी तक्रार बिल्डर विकासकुमार राठी यांनी ठाण्यातील खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरिक्षक प्रदिप शर्मा यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार नारपोली पोलीस ठाण्यात भाजप नगरसेवक निलेश चौधरी,हनुमान चौधरी व साथीदार महेश पाटील यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.या घटनेमुळे ठाण्यानंतर भिवंडीतील बिल्डरांना धरून राजकारण करणाºया महानगरपालिकेतील गोल्डन गँगवरील पडदा लवकरच उठणार असल्याच्या चर्चा शहरात रंगल्या आहेत.