भरारी पथकाच्या अधिकाऱ्यालाच लाच घेताना अटक

By पंकज पाटील | Published: September 4, 2023 11:10 PM2023-09-04T23:10:45+5:302023-09-04T23:10:55+5:30

अंबरनाथ मध्ये वीज चोरीवर कारवाई करण्यासाठी जे अधिकारी भरारी पथकात दाखल होते त्या अधिकाऱ्यांनीच वीज चोरी करणाऱ्या ग्राहकाकडून तब्बल 75 हजारांची लाज मागितल्याची घटना समोर आली आहे.

Bharari team officer arrested for accepting bribe | भरारी पथकाच्या अधिकाऱ्यालाच लाच घेताना अटक

भरारी पथकाच्या अधिकाऱ्यालाच लाच घेताना अटक

googlenewsNext

अंबरनाथ: अंबरनाथ मध्ये वीज चोरीवर कारवाई करण्यासाठी जे अधिकारी भरारी पथकात दाखल होते त्या अधिकाऱ्यांनीच वीज चोरी करणाऱ्या ग्राहकाकडून तब्बल 75 हजारांची लाज मागितल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर आज सायंकाळी ठाण्याच्या लाच लचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी भरारी पथकातील एका अभियंताला त्याच्या इतर तीन साधीदारांसह अटक केली आहे.

आरोपी हेमंत गोविंद तिडके (34 ) हे कल्याणच्या वीज वितरण कार्यालयात असिस्टंट या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्यासह अंबरनाथचा कनिष्ठ लिपिक सागर ठाकूर ( 32),  पांडुरंग देविदास सुर्यवंशी ( 42) आणि नितीन साळवे (३५) या चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी तिडके याने  भरारी पथकाद्वारे तक्रारदार हे राहत असलेल्या घराच्या लाईट मीटर ताब्यात घेऊन तपासणीसाठी नेले. त्यामध्ये छेडछाड झाली असून गेल्या 3 वर्षाचे लाईट बिल दंडासह 3 ते 4 लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले. परंतु एवढी रक्कम भरायची नसेल तर फक्त 1 लाख पर्यंत बिल पाठवितो असे सांगून वरील आरोपींनी 75 हजारांची लाच मागितली.

संबंधित ग्राहकाने या प्रकरणाची तक्रार ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले त्यानुसार आज अधिकाऱ्यांनी सापळा रचून या चौघांना अटक केली आहे. या दोघांच्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Bharari team officer arrested for accepting bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.