भार्इंदर : प्रेमभंगातून विद्यार्थ्याचा स्वत:वर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:39 AM2018-02-28T01:39:26+5:302018-02-28T01:39:26+5:30

रॉयल कॉलेज परिसरात मंगळवारी दुपारी एका युवकावर गोळीबार झाल्याची माहिती पसरली, पण अधिक चौकशीत एकतर्फी प्रेमभंगातून त्यानेच स्वत:वर गोळीबार केल्याचे पोलिसांना सांगितले.

Bharindar: Firing a student himself from love | भार्इंदर : प्रेमभंगातून विद्यार्थ्याचा स्वत:वर गोळीबार

भार्इंदर : प्रेमभंगातून विद्यार्थ्याचा स्वत:वर गोळीबार

Next

भार्इंदर : रॉयल कॉलेज परिसरात मंगळवारी दुपारी एका युवकावर गोळीबार झाल्याची माहिती पसरली, पण अधिक चौकशीत एकतर्फी प्रेमभंगातून त्यानेच स्वत:वर गोळीबार केल्याचे पोलिसांना सांगितले.
जयप्रकाश दिनेश गिरी (२१) असे त्याचे नाव असून कांदिवलीच्या समतानगरात नीळकंठ सोसायटीत राहतो. गोळीबाराची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमी अवस्थेतील युवकाला मीरा रोडच्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी नेले. नंतर त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सुरुवातीला दोन अज्ञात व्यक्तींनी आपल्यावर गोळीबार केल्याचे सांगितले. पण घटनास्थळी गावठी कट्टा सापडल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी सखोल चौकशी केल्यावर त्या युवकाने एकतर्फी प्रेमभंगातून स्वत:वर गोळीबार केल्याचे सांगितले.
हा कट्टा त्याने उत्तरप्रदेशातील आझमगड येथून आणल्याचे पोलिसांना सांगितले. त्या विद्यार्थ्यावर हत्यारबंदी कायद्यासह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जयप्रकाश कॉमर्सच्या शेवटच्या वर्गात असून शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी घरात खाजगी शिकवणी घेतो. त्याचे महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेम होते. तिला लग्नासाठी विचारले, पण तिने नकार दिल्याने त्याने रागाच्या भरात स्वत:वर गावठी कट्ट््यातून कंबरेजवळ गोळी झाडल्याचे चौकशीत समोर आले.

Web Title: Bharindar: Firing a student himself from love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.