भार्इंदर पालिका : कार्यशाळेला दोघेच नगरसेवक, ९३ जणांनी फिरवली पाठ, अधिकारी नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:03 AM2017-11-18T01:03:54+5:302017-11-18T01:04:01+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वतीने २०१८ मध्ये केंद्राकडून पुन्हा स्वच्छ भारत अभियानातंर्गत मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी नगरसेवकांसाठी कार्यशाळा ठेवली होती.
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वतीने २०१८ मध्ये केंद्राकडून पुन्हा स्वच्छ भारत अभियानातंर्गत मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी नगरसेवकांसाठी कार्यशाळा ठेवली होती. याला भाजपाचे केवळ दोन नगरसेवक सोडल्यास ९३ नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने प्रशासनाला ही कार्यशाळाच गुंडाळावी लागली.
या कार्यशाळेत नगरसेवकांना प्रभागातील नागरिकांना जागरूक करण्याचे प्रशिक्षण अधिकाºयांकडून देण्यात येणार होते. स्वच्छतेबाबत प्रश्नावली तयार केली आहे. त्यात स्वच्छ सर्वेक्षणात शहराने सहभाग घेतल्याची माहिती लोकप्रतिनिधींसह नागरिकांना आहे का, सध्या शहर स्वच्छ आहे का, कचराकुंड्यांचा वापर तसेच कचरा वर्गीकरणाबाबतचे समाधान, शहर हगणदारीमुक्त झाले आहे का आदी प्रश्न नमूद केले आहेत. त्याची उत्तरे थेट लोकप्रतिनिधींसह नागरिकांना द्यावी लागणार आहेत.
तत्पूर्वी या प्रश्नांद्वारे अद्यापही शहरातील अस्वच्छतेबाबत काही सूचना असल्यास त्या प्रशासनाकडे द्याव्यात, या हेतूने आरोग्य विभागाने नगरसेवकांची कार्यशाळा घेतली होती. परंतु, कार्यशाळेला ९५ पैकी भाजपाचे नगरसेवक सुरेश खंडेलवाल व राकेश शहा या दोन नगरसेवकांनीच हजेरी लावली. उर्वरित ९३ नगरसेवकांनी पाठ फिरवली. यामुळे माहिती पुस्तिका व नाष्ताचा खर्च वाया गेला.
११ वाजता सुरू झालेल्या या कार्यशाळेत उपस्थिती वाढेल या उद्देशाने उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी तब्बल दोन तास वाट पाहिली.
नगरसेवकांची उदासीनता
उपस्थित नगरसेवकांनी पालिकेच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली तर पालिका अधिकारी व कर्मचाºयांनीही नगरसेवकांच्या स्वच्छतेप्रती असलेल्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली.