भार्इंदर खाडीपूल रेल्वे मोडीत काढणार ?

By admin | Published: December 22, 2015 12:11 AM2015-12-22T00:11:34+5:302015-12-22T00:11:34+5:30

पश्चिम रेल्वेने अनेक वर्षांपासून बंद असलेले वसई खाडीवरील दोन्ही पूल मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पाणजू गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आणि वीज पुरवठा करणारी केबल

Bharindar will break the railways? | भार्इंदर खाडीपूल रेल्वे मोडीत काढणार ?

भार्इंदर खाडीपूल रेल्वे मोडीत काढणार ?

Next

वसई : पश्चिम रेल्वेने अनेक वर्षांपासून बंद असलेले वसई खाडीवरील दोन्ही पूल मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पाणजू गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आणि वीज पुरवठा करणारी केबल काढण्याचे आदेश रेल्वेने दिले आहेत. त्यामुळे चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या तीन हजार लोकवस्तीच्या पाणजू गावातील पाणी आणि वीज पुरवठा लवकरच खंडीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
चारही वाजूने पाण्याने वेढलेल्या पाणजू बेटावर नरवीर चिमाजी आप्पांच्या काळापासून वस्ती आहे. या ऐतिहासिक गावात जाण्यासाठी बोटीचाच पर्याय आहे. रेल्वेचा वावर सुरु झाल्यानंतर ब्रिटीशांनी वसई खाडीवर उत्तर आणि दक्षिणेला दोन पूल बांधले होते. या पुलावरून नायगांव किंवा भार्इंदर रेल्वे स्थानकावरून चालत गावात पोहोचण्याची दुसरी व्यवस्था झालेली आहे. १९७१ साली या गावाला स्टेम प्राधिकरणामार्फत रेल्वेपुलावरून भार्इंदरमार्गे पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करण्यात आला. त्यानतंर १९८६ मध्ये पूलावरूनच केबल टाकून महावितरणने वीजपुरवठाही केला आहे. या दोन्ही वाहिन्या जुन्या पुलांवरून करण्यात आल्या होत्या. ब्रिटीशकालिन पूल धोकादायक असल्याने रेल्वेने विरार-बोरीवली चौपदरीकरणात दुसरे दोन पूल बांधले. त्यानंतर दोनही पूलावरून रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली.
दोन्ही पूल दुरुस्ती करून हलक्या वाहनांसाठी त्याचा वापर व्हावा अशी मागणी करण्यात आली होती. पण, पूल धोकादायक असल्याने रेल्वेने सुरक्षिततेत्या कारणास्तव ही मागणी धुडकावली होती. त्यानंतर राज्य सरकारने एमएमआरडीएच्या मदतीने वसई आणि भार्इंदर दरम्याने वाहतूकीसाठी नवे पूल बांधण्याचा प्रस्तावही तयार केला होता. पण, प्रचंड खर्च असल्याने त्याबाबतीत अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. हा पूल पाणजूकरांसाठी दळणवळण आणि इतर सोयी-सुविधांसाठी उपयुक्त होता.
आता नवा पूलही होण्याची चिन्हे दिसत नसताना रेल्वेने आपले दोन्ही पूल मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेम प्राधिकरणाला १६० मिलीमिटर व्यासाची पाईपलाईन आणि महावितरण कंपनीला वीज पुरवठा करणाऱ्या केबल तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश रेल्वेचे उपमुख्य अभियंता एम.के.अग्रवाल यांनी दिले आहेत. या निर्देशामुळे पाणजुकरांची वीज आणि पाणी हिरावली जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bharindar will break the railways?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.