भारिप हा तर बहुजनांचा पक्ष
By admin | Published: February 14, 2017 02:56 AM2017-02-14T02:56:10+5:302017-02-14T02:56:10+5:30
भारिप एका जातीचे नव्हे, तर बहुजनांचे नेतृत्व करीत असल्याचे प्रतिपादन भीमराव आंबेडकर यांनी जाहीर सभेत केले. नागसेन मैदानात
उल्हासनगर : भारिप एका जातीचे नव्हे, तर बहुजनांचे नेतृत्व करीत असल्याचे प्रतिपादन भीमराव आंबेडकर यांनी जाहीर सभेत केले. नागसेन मैदानात झालेल्या सभेत त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे व शहरातील समस्या मांडल्या.
ज्या नागरिकांना वर्षानुवर्षे हातपंपाचे पाणी प्यावे लागते, त्यांनी अशांना का निवडून द्यावे, असा प्रश्न या वेळी केला.
उल्हासनगर पालिका निवडणुकीत भारिपने १३ ठिकाणी उमेदवार उभे केले. पक्षाचे खाते उघडून पक्षाला बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
पक्ष एका जातीचा नसल्याचे अकोला पॅटर्नवरून सिद्ध झाले असून पक्षाचे ३ नगराध्यक्ष निवडून आले. तसेच ४६ नगरसेवक विविध ठिकाणी निवडून आल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेषराव वाघमारे, सारंग थोरात, नाना रौराळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)