भातसा धरण भरले ९५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:49 AM2021-09-08T04:49:09+5:302021-09-08T04:49:09+5:30
भातसानगर : शहापूर तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेले भातसा धरण भरून वाहण्यासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यातच विद्युत केंद्रातून विसर्ग ...
भातसानगर : शहापूर तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेले भातसा धरण भरून वाहण्यासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यातच विद्युत केंद्रातून विसर्ग करण्यास सुरुवात केल्याने धरण भरून वाहण्यास वेळ लागणार आहे.
तालुक्यातील तानसा, वैतरणा अप्पर वैतरणा ही धरणे कधीच भरून वाहू लागली असली तरी मुंबईला सर्वात अधिक पाणीपुरवठा करणारे भातसा अजूनही भरले नसल्याने मुंबईकरांसह उपनगर व तालुक्याला मोठी चिंता भेडसावू लागली आहे. आजच्या मितीस धरणाची पाणीपातळी वाढली आहे. ९५.६३ टक्के इतका पाणीसाठा आज झाला आहे. मात्र, विद्युत केंद्रातून १८.७३१ क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला असल्याने धरण भरून वाहण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. मंगळवारी धरणक्षेत्रात १०८.०० मिलीमीटर पाऊस झाला असून आतापर्यंत २२००.०० मिलीमीटर पाऊस झाला आहे. मंगळवारी धरणाची पाणीपातळी १४०.५७ मीटर नाेंदवली गेली असून पूर्ण संचय पातळी १४२.०७ मीटर आहे. ९७६.१० द.ल.घ.मी. क्षमता असलेल्या या धरणात सध्या ९३४.९४६ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे. धरणात येणारे नद्यांच्या प्रवाहाच्या दिशेला समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू असल्याने मातीसह गढूळ पाणी नद्या, ओढ्यांद्वारे धरणात येऊन साठले आहे.