भाईंदरमध्ये कांदळवनाची कत्तल, भराव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 10:42 PM2019-12-29T22:42:01+5:302019-12-29T22:42:14+5:30

पालिकेचे दुर्लक्ष : बांधकामांना पुरविल्या जातात प्राथमिक सुविधा, न्यायालयाचे आदेश धाब्यावर

In Bhayandar, onion slaughter, filing begins | भाईंदरमध्ये कांदळवनाची कत्तल, भराव सुरूच

भाईंदरमध्ये कांदळवनाची कत्तल, भराव सुरूच

Next

मीरा रोड : कायद्याने असलेली बंदी आणि उच्च न्यायालयाचा आदेश असूनही मीरा-भार्इंदरमध्ये सर्रास कांदळवनाची कत्तल आणि भराव सुरू आहे. राजरोसपणे हा प्रकार सुरू असूनही यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. या बांधकामांना वीजपुरवठा, करआकारणी, पाणी तसेच गटारे, स्वच्छतागृहे, रस्ते आदी सुविधा दिल्या गेल्या आहेत.

महापालिकेच्या नगररचना विभागाने तर कांदळवनाचे गुन्हे दाखल असूनही बांधकाम परवानगी दिली आहे. कांदळवन ºहासाचे सर्वात जास्त गुन्हे शहरात दाखल आहेत. भार्इंदर पश्चिमेच्या राधास्वामी सत्संग परिसरात थेट कांदळवनात बेकायदा भराव सुरूच आहे. या ठिकाणी कोकण आयुक्तांच्या कांदळवन संरक्षण उपसमितीमार्फत ८ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहणी झाली होती. त्यावेळीही जागेवरील कांदळवनात व त्यापासून ५० मीटर अंतरापर्यंत भराव व कुंपणाचे बांधकाम आदी झालेले आढळले होते. त्याआधी तहसीलदार अधिक पाटील, मंडळ अधिकारी दीपक अनारे आदींनी पाहणी केली होती.

आधीच्या भराव, बांधकामप्रकरणी गुन्हे दाखल केले गेले नाहीत. त्यातच नव्याने भराव केला जात आहे. आजूबाजूला झुडुपे जाळली जात आहेत. याप्रकरणी आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर पालिकेने एका प्रकरणात भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. परंतु, याच परिसरातील अन्य उल्लंघन प्रकरणांत गुन्हे दाखल झाले नसून भरावही काढलेला नाही.

घोडबंदर येथे अदानी वीज उपकेंद्रामागे तसेच आरएमसी प्रकल्पामागे मोठ्या प्रमाणात कांदळवनाची तोड केली आहे. शिवाय, नव्याने कांदळवन तोडणे सुरूच आहे. त्यातच भूमिपुत्रांकडून कांदळवन, सीआरझेड आहे सांगून कवडीमोलाने जमिनी विकून देणारे दलाल आणि खरेदी करणाऱ्या बड्या मंडळींनी धुमाकूळ घातला आहे. कवडीमोलाने जमीन खरेदी करून त्यावरील कांदळवन तोडून भराव करून भूखंड तयार करायचा आणि तो विकासासाठी मोकळा करून कोट्यवधी रुपये कमवायचे, असा व्यवसाय या भागात जोरात सुरू आहे.

संबंधितांवर कारवाईची मागणी
कांदळवन, सीआरझेडमधील बेकायदा भराव काढून टाका, येथील बांधकामे हटवा तसेच कांदळवनाची लागवड करून भरतीच्या पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याची मागणी वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद, रूपाली श्रीवास्तव, प्रदीप जंगम, इरबा कोनापुरे आदींनी केली आहे. डोळेझाक करणाºया बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे ते म्हणाले.

Web Title: In Bhayandar, onion slaughter, filing begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.