भाईंदर पश्चिमेचा बेकायदा रविवार बाजार पुन्हा जोमात; वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन देखील महापालिकेची कारवाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 07:51 PM2022-04-03T19:51:33+5:302022-04-03T19:51:39+5:30

महापालिकेकडून कारवाई केली जात नसल्याने बेकायदा बाजाराशी पालिकेचा वरदहस्त असल्याच्या आरोपांना पुन्हा बळ मिळाले आहे

Bhayander West's illegal Sunday market revives; Municipal Corporation has not taken any action despite the huge traffic jam | भाईंदर पश्चिमेचा बेकायदा रविवार बाजार पुन्हा जोमात; वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन देखील महापालिकेची कारवाई नाही

भाईंदर पश्चिमेचा बेकायदा रविवार बाजार पुन्हा जोमात; वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन देखील महापालिकेची कारवाई नाही

googlenewsNext

मीरारोड - भाईंदर पश्चिम येथील मुख्य  रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर बेकायदा रविवार बाजार आज ३ एप्रिलच्या रविवारी पुन्हा जोमात भरला होता . त्यामुळे मुख्य मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती . परंतु महापालिके कडून मात्र कारवाई केली जात नसल्याने बेकायदा बाजाराशी पालिकेचा वरदहस्त असल्याच्या आरोपांना पुन्हा बळ मिळाले आहे . 

भाईंदर रेल्वे स्थानका पासुन थेट उत्तन - गोराई र्पयत जाणारा हा एकमेव मुख्य मार्ग आहे . येथून एसटी, एमबीएमटी, बेस्ट आदी सार्वजनिक उपक्रमांच्या बससेवांसह रिक्षा , दुचाकी, चारचाकी, अवजड मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ असते.  परंतु मुख्य रस्त्यावरच  बेकायदा रविवार बाजार मुळे प्रचंड वाहतुक कोंडी होते . लोकांना चालणे अवघड होते . आपत्कालिन वेळेत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन जाऊ शकत नाही . अर्धा अर्धा तास वाहतुक ठप्प होते व नागरिक  अडकुन पडतात. पालिका मुख्यालय, पोलीस ठाणे ,  बस स्थानकांना फेरीवाल्यांचा विळखा असतो . फेरीवाले जाताना मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व अन्य कचराया रस्त्यात टाकून जातात . प्लास्टिक बंदी असून देखील सर्रास प्लास्टिक पिशव्या आदींचा वापर केला जातो . 

त्यातच भुरटे चोर, पाकिटमारांसह महिला - मुलींची छेड काढणारया रोडरोमीयोंच्या तक्रारी होतात . त्यातच सध्या महापालिकेच्या भुयारी गटारच्या कामा मुळे भाईंदर पोलीस ठाण्या पासून पुढे सुभाषचंद्र बोस मैदान पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे . त्यामुळे आधीच वाहतुकीची कोंडी त्यात बेकायदा रविवार बाजारा मुळे जाच प्रचंड वाढला आहे . 

ह्या बेकायदा रविवार बाजारा विरुद्ध नगरसेवक अवाक्षर काढताना दिसत नाही . बाजार वसुली ठेकेदारसाठी तर हा बाजार बक्कळ शुल्क वसुलीची पर्वणी असतो . त्यात महापालिका बेकायदा बाजरावर ठोस कारवाई करत नसल्याने एकूणच ह्यात भ्रष्टाचारी संगनमत असल्याचे आरोप होत आले आहेत .  मध्यंतरी काही काळ रविवारी सकाळ पासून पालिकेचे पथक या मुख्य मार्गावर फेरीवाल्यांना बसू देत नव्हते . दुपारी पथक जायचे आणि फेरीवाले पुन्हा बसायचे . परंतु त्यामुळे सकाळ ते दुपार दरम्यान मात्र पालिका मुख्यालया सह मुख्य रस्ता , बस स्थानक वर अतिक्रमण होत नसल्याने रस्ते मोकळे व स्वच्छ दिसत होते .  परंतु आजच्या रविवारी मात्र पालिकेच्या पथकाने कारवाई करण्या ऐवजी फेरीवाल्यांना बसण्यास मोकळे रान दिल्याने पुन्हा प्रचंड वाहतूक कोंडी आणि जाच नागरिकांना सहन करावा लागला . 

Web Title: Bhayander West's illegal Sunday market revives; Municipal Corporation has not taken any action despite the huge traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.