भाईंदरच्या  १० मच्छिमार बोटी किनाऱ्या पासून लांबच; काही बोटींशी संपर्क नाही; कोस्टगार्ड ची घेतली जात आहे मदत 

By धीरज परब | Published: August 9, 2022 09:31 PM2022-08-09T21:31:57+5:302022-08-09T21:32:39+5:30

Bhayander News: वादळी पाऊस व खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील सुमारे १० बोटी अजून किनाऱ्यावर परतल्या नसल्याने कोळीवाड्यात चिंतेचे वातावरण आहे.

Bhayander's 10 fishing boats far from shore; No contact with some boats; Assistance is being sought from the Coast Guard | भाईंदरच्या  १० मच्छिमार बोटी किनाऱ्या पासून लांबच; काही बोटींशी संपर्क नाही; कोस्टगार्ड ची घेतली जात आहे मदत 

भाईंदरच्या  १० मच्छिमार बोटी किनाऱ्या पासून लांबच; काही बोटींशी संपर्क नाही; कोस्टगार्ड ची घेतली जात आहे मदत 

googlenewsNext

मीरारोड - वादळी पाऊस व खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील सुमारे १० बोटी अजून किनाऱ्यावर परतल्या नसल्याने कोळीवाड्यात चिंतेचे वातावरण आहे . तर काही बोटींशी संपर्क होत नाही व काही बोटी परतीच्या वाटेवर आहेत . कोस्टगार्डच्या मदतीने समुद्रात अडकलेल्या बोटींची माहिती घेतली जात आहे . 

वादळी पावसाचा इशारा मिळाल्या नंतर शनिवारीच मच्छीमारांना धोक्याच्या सूचना दिल्या होत्या . परंतु आधीच काही बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या असल्याने त्या किनाऱ्याकडे परतण्याची प्रतीक्षा मच्छीमार करत होते . बोटीवर गेलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबातील महिलांनी आज मंगळवारी मच्छिमार संस्थांच्या कार्यालयात गर्दी केली. समुद्रात असलेल्या नाखवांचा संपर्क होत नसल्याने कोळी महिलांनी चिंता व्यक्त करत होत्या.   

त्यामुळे मच्छीमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी समुद्रातुन परत न आलेल्या बोटीची माहिती घेण्यास सुरवात केली . उत्तन मच्छीमार सहकारी संस्थेच्या एकूण ५ बोटी, डोंगरी चौक सोसायटी च्या १६ व पाली उत्तन मच्छीमार सोसायटी ची १ अश्या एकूण २२ बोटी मंगळवारी दुपार पर्यंत समुद्रात अडकून पडल्या होत्या . त्यातील काही बोटींचा संपर्क होत नव्हता.

या प्रकरणी मत्स्य विभागा सह संबंधित शासकीय यंत्रणांना कळवण्यात आल्या नंतर कोस्टगार्ड ने समुद्रात संकल्प जहाजाच्या माध्यमातून बोटींची शोध मोहीम राबवली . त्यावेळी उत्तन बंदरा पासून खोल समुद्रात काही बोटी आढळून आल्या . सायंकाळी जलधन तर रात्री अब्राहम ह्या बोटी परतल्या . शिवाय डोंगरी - चौकच्या १० बोटी रात्री उशिरा पर्यंत किनाऱ्या जवळ आल्या होत्या . रात्री उशिरा पर्यंत १२ बोटी किनाऱ्याला आल्या होत्या . तर आणखी १० बोटींची प्रतीक्षा होती .  त्यापैकी चौकच्या ६ बोटी समुद्रात जाळे टाकून थांबल्या होत्या त्या बुधवारी परतण्याची शक्यता आहे असे संस्थेच्या विल्यम गोविंद यांच्या कडून सांगण्यात आले.

उत्तन भागातील बोटी समुद्रात अडकल्या असल्याने तातडीने अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती चे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी मत्स्य विभाग, कोसगार्ड आदींना कळवल्यावर कोस्टगार्डने जहाज व हेलिकॉप्टर ने समुद्रात बोटींची शोध मोहीम सुरु केली . काही बोटींशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे . तर बहुतांश बोटींशी संपर्क झाला असून काही बोटी परतल्या तर काही परतीच्या वाटेवर असल्याचे मच्छिमार नेते बर्नड डिमेलो यांनी सांगितले . 
 

Web Title: Bhayander's 10 fishing boats far from shore; No contact with some boats; Assistance is being sought from the Coast Guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.