भाईंदरच्या गुरु - शिष्याने थायलंड मध्ये मारली बाजी
By धीरज परब | Published: June 11, 2023 02:53 PM2023-06-11T14:53:12+5:302023-06-11T14:55:26+5:30
स्पर्धेमध्ये भारतासह जपान, युक्रेन , सौदी अरेबिया, मलेशिया, थायलंड, श्रीलंका आदी देशांनी सहभाग घेतला होता.
मीरारोड - थायलंड मध्ये २६ ते २८ मे दरम्यान झालेल्या "इंन्टरनेशनल मार्शल आर्ट गेम" मध्ये भाईंदरचे सुधीर वंजारी यांनी काता प्रकारात रौप्य पदक तर फाईट मध्ये कांस्य पदक जिंकले. त्यांचा शिष्य असलेला भाईंदरच्या अवर लेडी ऑफ नाझरेथ शाळेचा ११ वर्षीय विद्यार्थी वेदांत जाधव याने काता प्रकारात कांस्य पदक जिंकले.
स्पर्धेमध्ये भारतासह जपान, युक्रेन , सौदी अरेबिया, मलेशिया, थायलंड, श्रीलंका आदी देशांनी सहभाग घेतला होता. वंजारी हे गोडदेवचे राहणारे असून मूळचे सावंतवाडीचे आहेत . ते सेव्हन डिग्री ब्लॅक बेल्ट असून आंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच म्हणून काम केले आहे . इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झाली आहे .