भार्इंदर पालिका : वरिष्ठांचीही आता हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 06:48 AM2018-04-02T06:48:48+5:302018-04-02T06:48:48+5:30
महापालिकेतील वर्ग १, वर्ग २ च्या अधिकाऱ्यांसह कनिष्ठ अभियंत्यांनाही आता आॅनलाइन बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करत आयुक्तांनी या बड्या अधिकाºयांनाही पालिकेच्या सामान्य कर्मचाºयांच्या पंक्तीत हजेरीपटावर घेतले आहे. त्यामुळे मनमानीपणे कामावर येणाºया अधिकाºयांची चांगलीच पंचाईत झाली आहे. पालिकेने ५० कार्यालयांमध्ये ५६ यंत्रे बसवली आहेत. तर, शाळांमध्येही ही यंत्रे बसवण्याची कार्यवाही सुरू आहे.
मीरा रोड - महापालिकेतील वर्ग १, वर्ग २ च्या अधिकाऱ्यांसह कनिष्ठ अभियंत्यांनाही आता आॅनलाइन बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करत आयुक्तांनी या बड्या अधिकाºयांनाही पालिकेच्या सामान्य कर्मचाºयांच्या पंक्तीत हजेरीपटावर घेतले आहे. त्यामुळे मनमानीपणे कामावर येणाºया अधिकाºयांची चांगलीच पंचाईत झाली आहे. पालिकेने ५० कार्यालयांमध्ये ५६ यंत्रे बसवली आहेत. तर, शाळांमध्येही ही यंत्रे बसवण्याची कार्यवाही सुरू आहे.
नगरपालिकेपासून तसेच महापालिका झाल्यानंतरही अधिकारी, कर्मचाºयांच्या हजेरीचा मोठा घोळ नेहमीच चर्चेत राहिला आहे. कामावर यायचे नाही आणि नंतर येऊन हजेरी लावायची किंवा हजेरी लावून निघून जायचे आदी प्रकार सर्रास चालतात. नोंदवहीमध्ये हजेरी नोंदवण्याचे प्रकार तर आजही पालिकेच्या अनेक विभागांत चालले आहेत.
काही वर्षांआधी मुख्यालयात बायोमेट्रिक थम्ब इम्पे्रशनच्या आधारे हजेरी सुरू केली असता अनेक कामचुकार अधिकारी, कर्मचाºयांचा छुपा विरोध सुरू झाला. अगदी मशीनमध्ये पाणी ओतण्यापासून अनेक खटाटोप केले गेले. पुढे बायोमेट्रिकच्या आधारे हजेरीनुसार पगार काढण्याचे अनेक आदेश निघाले. पण, त्याचे काटेकोर पालन झालेच नाही.
पालिकेच्या रुग्णालयातही सकाळी हजेरी लावून जाणारे कामावरून निघताना मात्र हजेरी लावत नसल्याचे उघड झाले. तर, आरोग्य केंद्र व शाळांमध्येही गैरहजर असताना नंतर येऊन हजेरी लावण्याच्या घटनासुद्धा समोर आल्या. त्यातही वर्ग १ च्या अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता आदींना हजेरीच्या कक्षेत आणले जात नव्हते. शिवाय, वर्ग २ चे काही अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंते यांनीदेखील कारणे पुढे करून आपली हजेरीतून सुटका करून घेतली होती.
हजेरीचा घोळ व कामचुकार अधिकारी, कर्मचाºयांवर आळा घालण्यासाठी अखेर आधारवर आधारित बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी घेतला होता.
आस्थापनेवर स्थायी व अस्थायी स्वरूपात काम करणाºया १७२५ अधिकारी व कर्मचाºयांनी नोंदणी करत आधारकार्डवर आधारित बायोमेट्रिक थम्ब इम्पे्रशन मशीनवर हजेरी सक्तीची करण्यात आली. जानेवारी महिन्यात या मशीन आणल्यानंतर फेब्रुवारीपासून त्यांची अंमलबजावणी सुरू झाली. परंतु, त्यामध्ये वर्ग-१ चा एकही अधिकारी हजेरी लावत नव्हता. शिवाय, वर्ग २ चे काही अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंतादेखील या हजेरी यंत्राचा वापर करत नव्हते.
आता १ एप्रिलपासून वर्ग १ पासून वर्ग ४ च्या सर्व अधिकारी तसेच कर्मचाºयांना यंत्राद्वारे हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. महापौर डिम्पल मेहता यांनीही बड्या अधिकाºयांना हजेरी बंधनकारक करण्याची मागणी केली होती.
मुुख्यालय, रुग्णालय, प्रभाग कार्यालय, नगररचना, वसुली कार्यालय, पाण्याच्या टाक्या, आरोग्य केंद्र, बालवाड्या आदी सुमारे ५० ठिकाणी पालिकेने ५६ हजेरी यंत्रे बसवली आहेत. आपला आधार क्रमांक टाकल्यानंतर त्याला बोटांच्या ठशांनी हजेरी लावायची आहे. जाताना पण तीच पद्धत अनुसरायची आहे. पालिकेच्या हजेरीसाठीच्या संकेतस्थळावरही याची माहिती अपडेट होत राहील.
रजेचा अर्जही आॅनलाइन भरता येणार
रजेचा अर्ज पण आॅनलाइन भरता येणार असून तो मंजूर झाल्याचेही कळेल. आस्थापना विभागाकडे मास्टर लॉग इन असल्याने त्यांना पगार काढताना प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांचा हजेरीडाटा वेळेसह कळणार आहे.