भिवंडीत चक्रीवादळामुळे ११ झाडे पडली, सुदैवाने जीवितहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:42 AM2021-05-18T04:42:06+5:302021-05-18T04:42:06+5:30

भिवंडी : चक्रीवादळामुळे तुफान वाऱ्यासह जोरदार पावसाने भिवंडी शहरासह ग्रामीण भागात सकाळपासून हजेरी लावली. वादळ वाऱ्याने शहरात ठिकठिकाणी ...

In Bhiwandi, 11 trees fell due to cyclone, fortunately no casualties were reported | भिवंडीत चक्रीवादळामुळे ११ झाडे पडली, सुदैवाने जीवितहानी नाही

भिवंडीत चक्रीवादळामुळे ११ झाडे पडली, सुदैवाने जीवितहानी नाही

Next

भिवंडी : चक्रीवादळामुळे तुफान वाऱ्यासह जोरदार पावसाने भिवंडी शहरासह ग्रामीण भागात सकाळपासून हजेरी लावली. वादळ वाऱ्याने शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहरातील अंजुरफाटा, नारपोली, कल्याण रोड, अशोक नगर, बाळा कंपाउंड आदी भागात अतिवृष्टी व वाऱ्यामुळे २० झाडे कोसळल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यापैकी ११ झाडे उद्यान विभाग व अग्निशमन विभागाच्या साहाय्याने उचलण्यात आली. उर्वरित ९ झाडे उचलण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान धामणकर नाका अंजुरफाटा मार्गावर असलेल्या पारसिक बँकेसमोर भलामोठा वृक्ष कोसळला. हा वृक्ष रस्त्याच्या मधोमध पडल्याने काही काळ वाहतूककोंडी झाली होती. घटनास्थळी मनपा आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन दल दाखल झाले. कटरच्या साहाय्याने झाड कापून बाजूला करण्यात आले. बाळा कंपाउंड येथे मोठे झाड पडले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र हे झाड या ठिकाणी उभ्या असलेल्या रिक्षावर पडल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले.

..........

वाचली

Web Title: In Bhiwandi, 11 trees fell due to cyclone, fortunately no casualties were reported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.