विमानतळाला `दिबां`चे नाव देण्याचा ठराव भिवंडीत मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:30 AM2021-06-01T04:30:16+5:302021-06-01T04:30:16+5:30
भिवंडी : नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद हळूहळू चिघळण्याची चिन्हे दिसू लागली असून, विमानतळास आगरी समाजाचे लोकनेते दिवंगत दि. ...
भिवंडी : नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद हळूहळू चिघळण्याची चिन्हे दिसू लागली असून, विमानतळास आगरी समाजाचे लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी ठाणे, पालघर, रायगड पट्ट्यातील भूमीपुत्र आगरी-कोळी समाज आक्रमक होऊ लागला आहे. भिवंडी तालुका आगरी समाज उन्नती मंडळ पदाधिकाऱ्यांची सभा अंजुरफाटा समाज हॉल येथे अध्यक्ष अरुण बबन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झाली. त्यामध्ये विमानतळास दिबांचे नाव देण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.
येत्या १० जूनरोजी संपूर्ण जिल्ह्यात याच मागणीकरिता मानवी साखळी उभारण्यात येणार असून, भिवंडी तालुक्यातून हजारोंच्या संख्येने आगरी-कोळी भूमिपुत्रांसह बहुजन समाजाने सामाजिक अंतर बाळगत सहभागी होण्याचे आवाहन केल्याची माहिती अरुण पाटील यांनी दिली.
या सभेस खासदार कपिल पाटील, ज्येष्ठ नेते आर. सी. पाटील, संस्थापक-अध्यक्ष मनोहर पाटील, ॲड भारद्वाज चौधरी, विनोद पाटील, रमेश कराळे, ॲड किरण चन्ने, नामदेव पाटील, बाळाराम कराळे, हनुमान माळी, राजेंद्र भोईर, राजेंद्र मढवी, प्रताप पाटील, सतीश चौधरी आदी उपस्थित होते.
..........
वाचली